आपला जिल्हा अकोला

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने पक्षप्रतिनिधींची बैठक.,अचूक मतदारयाद्यांसाठी सर्वांनी सहकार्य करावे जिल्हाधिका-यांचे आवाहन. 

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने पक्षप्रतिनिधींची बैठक.,अचूक मतदारयाद्यांसाठी सर्वांनी सहकार्य करावे जिल्हाधिका-यांचे आवाहन. 

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने पक्षप्रतिनिधींची बैठक.,अचूक मतदारयाद्यांसाठी सर्वांनी सहकार्य करावे जिल्हाधिका-यांचे आवाहन. 

अकोला, दि. १९ : अचूक, अद्ययावत व पारदर्शक मतदार यादी तयार करणे ही लोकशाही प्रक्रियेतील अत्यंत महत्वपूर्ण बाब आहे. त्यामुळे विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने या कार्यासाठी व व्यापक मतदार जागृतीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे केले. 

भारत निवडणूक आयोगाने ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ (SIR) मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर केला आहे. त्याबाबत माहिती देण्यासाठी मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांच्या अध्यक्षतेत झाली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, इतर अधिकारी व सर्व पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

उपस्थित प्रतिनिधींना बैठकीत कार्यक्रमाची सविस्तर माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी नियुक्त करण्याचे व पुनरीक्षणाच्या अनुषंगाने मतदार जागृती करण्यासाठी सहकार्य करण्याचे यावेळी आवाहन करण्यात आले.  

जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, भारत निवडणूक आयोगाने १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. कार्यक्रमानुसार, दि. २० ते २९ जून दरम्यान तयारी, प्रशिक्षण व छपाई ही कामे पूर्ण केली जातील. त्यानंतर दि. ३० जून ते २९ जूलै या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देतील.  

मतदान केंद्रांच्या सुसुत्रीकरणाची प्रक्रिया दि. २९ जुलैपर्यंत पूर्ण होईल. सर्वांनी फॉर्म भरून देणे आवश्यक आहे. प्रगणना फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरून देण्याचीही सुविधा उपलब्ध आहे. प्रारूप मतदार यादी ५ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.

प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर दि. ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत हरकती व दावे असल्यास दाखल करता येतील. दि. ५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर दरम्यान सुनावणी आदी प्रक्रिया पूर्ण होऊन दावे व हरकती निकालात काढण्यात येतील. दि. ७ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!