सायबर सुरक्षा विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाच्या सायबर वॉरियर्स साक्षी फाटकर आणि हर्षा बिहाडे यांनी दिले प्रशिक्षण. स्व. नारायणराव बिहाडे विद्यालय वरूड येथे उपक्रम.
सायबर सुरक्षा विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाच्या सायबर वॉरियर्स साक्षी फाटकर आणि हर्षा बिहाडे यांनी दिले प्रशिक्षण. स्व. नारायणराव बिहाडे विद्यालय वरूड येथे उपक्रम.
सायबर सुरक्षा विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाच्या सायबर वॉरियर्स साक्षी फाटकर आणि हर्षा बिहाडे यांनी दिले प्रशिक्षण.
स्व. नारायणराव बिहाडे विद्यालय वरूड येथे उपक्रम.

स्व. नारायणराव बिहाडे विद्यालय वरुड येथे सायबर सुरक्षा या विषयावर विद्यार्थ्यांसाठी , 28 ऑगस्टला कार्यशाळा आयोजित करण्यात आली या कार्यशाळेमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अकोला येथील शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाच्या सायबर वॉरियर्स साक्षी फाटकर आणि हर्षा बिहाडे यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल आणि इंटरनेटच्या चुकीच्या वापरामुळे सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत या विषयावर त्यांनी महत्त्वाची माहिती सांगितली. विद्यार्थ्यांना मोबाईल आणि इंटरनेटच्या चुकीच्या वापरामुळे व्हाट्सअप, इंस्टाग्राम ,फेसबुक, एटीएम तसेच मोबाईल मध्ये गेम खेळल्यामुळे वाईट परिणाम कसे होतात ,फेक वेबसाईटच्या माध्यमातून फसवणूक कशी होते आणि आपण यापासून कसे सुरक्षित रहावे याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना सेटिंग सांगितले जसे की टु स्टेप वेरिफिकेशन आणि टू फॅक्टर ऑथेंटिफिकेशन कसे करावे, सिक्युरिटी सर्टिफिकेट असलेल्या वेबसाईटला विजिट अशा प्रकारे विद्यार्थ्यांना सुरक्षित टिप्स सांगितल्या विद्यार्थ्यांना आलेल्या शंकांचे निराकरण केले.
स्व. नारायणराव बिहाडे विद्यालय वरुड चे प्राचार्य यांच्या परवानगीने ही कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेमध्ये विद्यालयातील भालतीलक सर, राऊत सर,पाटकर सर, पाटिल सर, विद्या घुळे मॅडम, बाळापुरे सर, वानखडे सर, बिहाडे मॅडम, आणि बानेरकर सर, शिक्षक वृंद कर्मचारी उपस्थित होते.
सदर कार्यशाळा शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय अकोलाचे प्राचार्य डॉक्टर जे .एम. साबू सर, समन्वयक डॉक्टर दीप्ती पेठकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व क्विक हिल फाउंडेशन पुणे आणि महाराष्ट्र सायबर सेल यांच्या सहाय्याने करण्यात आली. विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्व. नारायणराव बिहाडे विद्यालय चे उपस्थित सर्वं शिक्षक वृंद, कर्मचारी, विद्यार्थी यांच्या सहकार्याने कार्यशाळा यशस्वीपणे पार पाडली गेली असल्याचे मनोगत व्यक्त करण्यात आले.