स्थळ निरीक्षण करून तेल्हारा पालिकेची मतदार यादी अंतिम करा – विकास मंचच्या अध्यक्षांनी दिल्या मोठ्या प्रमाणात तक्रारी.
स्थळ निरीक्षण करून तेल्हारा पालिकेची मतदार यादी अंतिम करा - विकास मंचच्या अध्यक्षांनी दिल्या मोठ्या प्रमाणात तक्रारी.
स्थळ निरीक्षण करून तेल्हारा पालिकेची मतदार यादी अंतिम करा – विकास मंचच्या अध्यक्षांनी दिल्या मोठ्या प्रमाणात तक्रारी.

तेल्हारा दि :- लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी निवडणुकांमध्ये पारदर्शकता असली पाहिजे परंतु होऊ घातलेल्या तेल्हारा नगरपरिषदेच्या निवडणुकी करिता ज्या प्रारूप मतदार याद्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या त्यामध्ये प्रचंड घोड असल्यामुळे तेल्हारा विकास मंच अध्यक्ष रामभाऊ फाटकर यांनी मतदार यादयानवर आक्षेप घेऊन तक्रार करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात तक्रारी करून संबंधित अधिकाऱ्यांनी स्थळ निरीक्षण करून वास्तव काय आहे ते जाणून घेऊन अंतिम मतदार यादी प्रकाशित करावी अशी मागणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.
होऊ घातलेल्या तेल्हारा नगरपरिषद च्या निवडणुकी संदर्भात तेल्हारा नगर परिषद मार्फत ज्या प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या होत्या त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोड झाल्याचे दिसून आले आहे प्रभाग क्रमांक एक मध्ये राहत असलेल्या मतदारांपैकी मोठया प्रमाणात मतदार बांधव यांचे नाव चुकीची पद्धत अवलंबविल्या गेल्याने प्रभाग क्रमांक दोन मध्ये व प्रभाग क्रमांक सहा मध्ये समाविष्ट झालेले आहे हा प्रकार बहुतांश प्रभागांमध्ये झाला आहे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात समाविष्ट करण्यात आलेल्या मतदारांबाबत पुराव्यासह विकास मंचने तक्रार केली आहे लोकशाही जिवंत ठेवण्याकरिता केलेल्या तक्रारीनुसार व दिलेल्या पुराव्यानुसार स्थळ निरीक्षण करून जे मतदार बांधव ज्या प्रभागात राहत आहेत वास्तव्यास आहेत त्यांची मालमत्ता सुद्धा ज्या प्रभागात आहे त्या प्रभागांमध्येच त्यांचे नाव समाविष्ट करण्यात यावेत व त्यानंतरच अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करावी अशी मांगणी करण्यात आली आहे सदर तक्रारीच्या प्रतिलिपी निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी तहसीलदार व मुख्याधिकारी ( निवडणूक अधिकारी ) नगरपरिषद तेल्हारा यांना देण्यात आले आहे.
तक्रार चुकीची ठरल्यास कोणत्याही कारवाईस सामोरे जाण्याची तयारी …
तेल्हारा नगरपरिषद मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकी संदर्भात ज्या प्रारुप मतदार याद्या प्रकाशित करण्यात आल्या त्यामध्ये प्रचंड घोड असल्याचे दिसून आले आहे तसेच मी नगरपरिषद कडे मतदार यादी संदर्भात जी तक्रार केली आहे ती चुकीची ठरल्यास माझी कोणत्याही कारवाईस सामोरे जाण्याची तयारी आहे.
रामभाऊ फाटकर
अध्यक्ष तेल्हारा विकास मंच