श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा येथे मोठ्या उत्साहात राष्ट्रीय क्रिडा दिन साजरा. मेजर ध्यानचंद यांची जयंती साजरी.

तेल्हारा येथील श्री शिवाजी हायस्कूल येथे आज मोठ्या उत्साहात राष्ट्रीय क्रिडा दिवस व मेजर ध्यानचंद यांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक व्ही.डी.गावंडे हे होते तर अतिथी म्हणून केंद्र प्रमुख सौ टोहरे मॅडम, घुंगळ सर विज्ञान मंडळ अध्यक्ष, सौ प्रेरणाताई कराळे मॅडम शिक्षक प्रतिनिधी,गजानन गावंडे शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रम चे सुत्रसंचालन शांतीकुमार सावरकर यांनी केले. यावेळी राष्ट्रीय क्रिडा दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी शपथ घेतली त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रीय क्रीडा दिनावर मनोगत व्यक्त केले. यावेळी शाळेतील खेळाडू व माजी खेळाडू यांचा सत्कार करण्यात आला.
विशेषत म्हणजे क्रिडा महोत्सवात लघु खेळ, सायकल रॅली, विविध क्रिडा स्पर्धा आयोजित करण्यात आले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वर्ग विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम चे संचालन आभार सुनिल वंजारी सर यांनी व्यक्त केले.