कबड्डी संघाच्या सराव शिबीराचे उद्घाटन संपन्न. हौसी कबड्डी असोसिएशन ग्रामीण अकोला व हनुमान क्रिडा मंडळ बेलखेड यांचे आयोजन.
कबड्डी संघाच्या सराव शिबीराचे उद्घाटन संपन्न. हौसी कबड्डी असोसिएशन ग्रामीण अकोला व हनुमान क्रिडा मंडळ बेलखेड यांचे आयोजन.
कबड्डी संघाच्या सराव शिबीराचे
उद्घाटन संपन्न.
हौसी कबड्डी असोसिएशन ग्रामीण अकोला व हनुमान क्रिडा मंडळ बेलखेड यांचे आयोजन.

कबड्डी ची पंढरी बेलखेड येथे हौसी कबड्डी असोसिएशन ग्रामीण अकोला व हनुमान क्रिडा मंडळ बेलखेड च्या वतीने तुमसर (भंडारा) येथे खेळल्या जाणाऱ्या कबड्डी स्पर्धेमध्ये निवडलेल्या जिल्हयाच्या कबड्डी संघाचे पाच दिवसाचे सराव शिबीराचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अकोला जिल्हा कबड्डी असोसियेशन चे अध्यक्ष की केशवराव पातोंड हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून असोसिएशन चे सचिव वासुदेवराव नेरकर, प्रल्हाद ढोरे, राजुभाऊ नेरकर, उमाकांत कवडे, नाना कुलट, राजु टोहरे, गजानन उंबरकर,बाळूभाऊ निमकर्डे,सत्यशील सावरकर, पप्पु उंबरकर उपस्थित होते.
या प्रसंगी रोहित नागपूरे, बंडू भाऊ खुमकर, संतोष ठाकूर, श्रीकृष्ण खुमकर, घाटोळ सर, राजु परमाळे, डॉ सुरेश अढाऊ, प्रशांत खुमकर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गजानन लासुरकार यांनी केले. तर आभार प्रदर्शन बंडूभाऊ खुमकर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संतोष चोपडे, जुनेद शहा, प्रशांत डिगे, निखिल खुमकर, अर्जुन चौखंडे, ज्ञानेश्वर इंगळे, पप्पु मलिये, फरहान शहा, मयुर गोमासे, सुमित वानखडे, अजय ठाकुर,रोहीत राऊत, अनिकेत वानखडे यांनी अथक परिश्रम घेतले.