धार्मिक

माऊंट आबू येथे पत्रकार आणि मीडिया प्रतिनिधींसाठी राष्ट्रीय संमेलन – दि. २६ ते ३० सप्टेंबर रोजी आयोजन.

समाजात शांती, एकता आणि विश्वास वृद्धींगत करण्यासाठी माध्यमांची भूमिका` या विषयावर होतील संवाद.

माऊंट आबू येथे पत्रकार आणि मीडिया प्रतिनिधींसाठी राष्ट्रीय संमेलन – दि. २६ ते ३० सप्टेंबर रोजी आयोजन.
समाजात शांती, एकता आणि विश्वास वृद्धींगत करण्यासाठी माध्यमांची भूमिका` या विषयावर होतील संवाद.

राजयोग शोध आणि प्रतिष्ठानच्या मीडिया विंग तर्फे २६ ते ३० सप्टेंबर २०२५ रोजी ब्रह्माकुमारीज् मुख्यालय माऊंट आबू येथे राष्ट्रीय मीडिया संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘समाजात शांती, एकता आणि विश्वास वृद्धींगत करण्यासाठी माध्यमांची भूमिका (Role of Media for Promoting Peace, Unity & Trust in Society)` या मुख्य विषयावर देशभरातील पत्रकार, मीडिया प्रतिनिधी यात सहभागी होतील. यात वृत्तपत्रे, टीव्ही, रेडिओ, केबल, शासकीय मीडिया संस्था, जनसंपर्क अधिकारी, जाहिरात संस्था, सायबर मीडियातील घटक, दूरसंचार आणि पोस्ट विभाग, मीडिया शिक्षण संस्था आदि क्षेत्रातील प्रतिनिधी सहभागी होतील.

संमेलनात सहभाग-
संमेलनात सहभागासाठी स्थानिक ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्रामार्फत नोंदणी होणार असून यासंदर्भात अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्राशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी डॉ. सोमनाथ वडनेरे, महाराष्ट्र माध्यम समन्वयक, मीडिया प्रभाग यांच्याशी 9850693705 यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

निसर्ग सौंदर्याने बहरलेले माऊंट आबू – अप्रतिम निसर्ग सौंदर्याने बहरलेले माऊंट आबू कडे जगातील नैसर्गीक आणि आध्यात्मिक उर्जेचे शक्तिपीठ म्हणून पाहिले जाते. सुंदर तलाव, धबधबे, बगीचे, डोंगर-द·या, नेत्रदिपक सुर्यास्त आदि नैसर्गीक पर्यटन स्थळाबरोबर स्थापत्यशास्त्राचा अद्वितीय देलवाडा, अचलगढ,गुरुशिखर, आबू अंबाजी, पीसपार्क, ज्ञानसरोवर, पांडवभवन,शांतीवन, ग्लोबल हॉस्पिटल आदि विविध विशाल आध्यात्मिक शक्तिस्थाने सुद्धा आहेत.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!