बेलखेड ची कालींका देवी भक्तांचे श्रद्धास्थान. दुरदुरचे भक्त नवरात्र उत्सवात येतात श्रद्धेने.
बेलखेड ची कालींका देवी भक्तांचे श्रद्धास्थान. दुरदुरचे भक्त नवरात्र उत्सवात येतात श्रद्धेने.
बेलखेड ची कालींका देवी भक्तांचे श्रद्धास्थान.
दुरदुरचे भक्त नवरात्र उत्सवात येतात श्रद्धेने.

बेलखेड तेल्हारा(सत्यशील सावरकर)दि.22-अकोला जिल्हा तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथील कालींका माता मंदिर परिसरातील जनतेचे श्रध्दास्थान असलेले जागृत देवस्थान आहे. दरवर्षी प्रमाणे येथील नवरात्रोत्सवाला सुरुवात येथील मलिये कुटूंबायांच्या हस्ते घटस्थापना करून करण्यात येते. या मंदिरात नऊ दिवस विविध धार्मिक पूजापाठ केले जातात.
तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथील तळेगाव बाजार रस्त्यावरील मलिये यांच्या शेतातील जागृत कालींका माता मंदिर प्रसिद्ध आहे.या परिसरातील हे कालींका मातेचे एकमेव मंदिर आहे. बेलखेड येथील किसन काणूजी मलीये यांनी त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांच्या स्मृतीत मंदीराची उभारणी केली आहे. या मंदिरात नवरात्री पर्वानिमीत्ताने भाविकांची मोठी मंदीयाळी असते. तालुक्यासह जिल्ह्याभरातून भाविक येथे दर्शनासाठी येतात. या भागातील हिंदीभाषीक लोकां सह इतरही भाविकांचे कालींका माता कुलदैवत असल्याने दूरदूर चे भाविक येथे श्रद्धेने येतात.
भक्तांच्या नवसाला पावणाऱ्या या देवीचे पंचक्रोशीत हजारो भक्त आहेत. दरवर्षी न चुकता भक्त मंदिरात हजेरी लावतात. मंदिराची रंगरंगोटी करून आकर्षक लायटिंगने सजावट केली जाते.
दरम्यान नऊ दिवस विविध कार्यक्रम होवून अष्टमीला होमहवन पूर्णाहुती महाआरती व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले जाते. महाकाली मंदिर कमेटी भक्तांच्या सोयीसुविधेसाठी प्रयत्न करित असतात.
या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नसल्याने भक्तांना मोठा त्रास सहन करावा लागतो. मंदिरासाठी बेलखेड आस नदी पुलाजवळून जुना तळेगाव बाजार गाव पादंण शेत रस्ता आहे हा पूर्ण झाल्यास बेलखेड, तळेगाव बाजार,मालपूरा, अकोली रूपराव व परिसरातील भक्तांना सोयीचे होईल तरी रस्ता व्हावा ही मागणी आहे.