बहुजन दीपस्तंभ स्व.दादासाहेब काळमेघ यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन.
श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा
बहुजन दीपस्तंभ स्व.दादासाहेब काळमेघ यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन.
श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा

श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा येथे बहुजन दीपस्तंभ स्व दादासाहेब काळमेघ माजी कुलगुरू नागपूर विद्यापीठ, माजी अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन वाहण्यात आले आहे.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शांतीकुमार सावरकर हे होते तर अतिथी म्हणून सौ प्रेरणाताई कराळे मॅडम, कु प्रियंका नंदाने मॅडम, अभिजित हिगणकर सह सुनिल वंजारी, बी जी पवार, धनंजय भंगाळे, भारत भोयर, अंकेश भांबुरकर, गजानन गावंडे, तेजराव कडू इत्यादी उपस्थित होते. यावेळी स्व दादासाहेब काळमेघ यांच्या जीवनावर आधारित विचार शांतीकुमार सावरकर यांनी व्यक्त केले.
दरम्यान सर्वप्रथम प्रतिमा पूजन,हारार्पण करून सामुहिक विनम्र अभिवादन वाहण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम चे सुत्रसंचालन कु आरती तायडे हिने केले आहे.