अ.भा.माळी महासंघ तेल्हाराकडून प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न.
गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांकडून सावित्रीबाई फुले,ज्योतिबा फुले व संत सावता महाराज यांची प्रतिमा व पुष्पगुच्छ भेट
अ.भा.माळी महासंघ तेल्हाराकडून प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न.गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांकडून सावित्रीबाई फुले,ज्योतिबा फुले व संत सावता महाराज यांची प्रतिमा व पुष्पगुच्छ भेट.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भागवत मंगल कार्यालय तेल्हारा येथे तालुक्यातील माळी समाजातील इयत्ता दहावी व बारावीतील प्राविण्य प्राप्त व इतरही क्षेत्रात विशेष नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा थाटात संपन्न झाला.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांकडून सावित्रीबाई फुले,ज्योतिबा फुले व संत सावता महाराज यांची प्रतिमा व पुष्पगुच्छ भेट म्हणून देण्यात येऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अ.भा.माळी महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुभाष सातव,स्वागताध्यक्ष म्हणून जि.प.अकोलाच्या मा.अध्यक्षा संगीताताई नंदकिशोर अढाऊ तर प्रमुख पाहुणे म्हणून बळीराम शिरस्कार मा.आमदार बाळापूर, प्रवीण लोखंडे जिल्हा उपनिबंधक अधिकारी अकोला, प्रमोद उलेमाले साहेब ठाणेदार तेल्हारा, संजय अढाऊ मा. जि. प.सदस्य अकोला,प्रकाश तायडे महासचिव राष्ट्रीय काँग्रेस कमिटी, संतोष हुसे ओबीसी नेते, शंकरराव गिरे समाजभूषण, उमेश मसने कार्याध्यक्ष समता परिषद, अनिल गिरे शेगाव मेळावा कार्याध्यक्ष,गणेश काळपांडे प्रदेशाध्यक्ष, प्रकाश दाते जिल्हाध्यक्ष, प्रवीण वाघमारे प्रदेश महासचिव सावता परिषद, प्रा.नितीन देऊळकर कार्याध्यक्ष, लक्ष्मणराव निखाडे जिल्हाध्यक्ष सावता परिषद, श्यामशील भोपळे मा.संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, प्रकाश राऊत मा. केंद्रप्रमुख संघटना, राजेश वानखडे अध्यक्ष शिक्षक समिती, गजानन वानखडे तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी, ढंगारे साहेब उपविभागीय कृषी अधिकारी, गौरव राऊत तालुका कृषी अधिकारी, रजनीताई वेरूळकर उद्योजिका, हरिदास भोपळे तालुकाध्यक्ष, रामदास खंडारे वधुवर मेळावा अध्यक्ष अकोला, वासुदेवराव देऊळकर मा.मुख्याध्यापक, सिंधुताई वानखडे सरपंच खंडाळा, रामदास इंगळे अन्नदाते, साधनाताई भोपळे, कल्पना राऊत आदर्श शिक्षिका, अरविंद उमाळे मा.पं.स.सदस्य, मनोहर राऊत मा. प्राचार्य, सुभाष भड तालुकाध्यक्ष समता परिषद, प्रतिभा इंगळे मा. सभापती, संतोष राऊत मुख्याध्यापक,ऍड श्रीकांत तायडे राष्ट्रीय सह सरचिटणीस आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष सातव, संगीताताई अढाऊ, प्रकाश तायडे,संतोष हुसे,ढंगारे साहेब,प्रमोद उलेमाले साहेब, बळीराम शिरस्कार, प्रवीण लोखंडे साहेब, रजनीताई वेरुळकार, साधनाताई भोपळे आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी असे मार्गदर्शन करून आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड श्रीकांत तायडे यांनी तर बहारदार संचालन शिक्षक सचिन ठोमरे व आभार प्रदर्शन प्रशांत खाडे यांनी केले.सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अ.भारतीय माळी महासंघ ,महाराष्ट्र माळी युवक संघटना,संत सावता सेना, महात्मा ज्योतिबा फुले विचार मंच,महात्मा फुले समता परिषद तालुका तेल्हारा च्या सर्व पदाधिकारी, सदस्य व समाज बांधवांनी परिश्रम घेतले.