वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उकळी परिसरातील दहा गावकऱ्यांची मागणी.
खासदार अनुप धोत्रे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी.
वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी
उकळी परिसरातील दहा गावकऱ्यांची मागणी.
खासदार अनुप धोत्रे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी.

अकोला जिल्हा तेल्हारा तालुक्यातील उकळी बाजार परिसरात वन्यप्राणी रोही, राणडुकरे, हरिण यांच्या हैदोसामुळे शेत पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होवून नुकसान होत आहे यांचा बंदोबस्त करण्यासाठी वरुड वडनेर, वांगरगाव, बाबुळगाव, उकळी बाजार, तळेगाव डवला, तळेगाव पातुडा, पिवंदळ, निंभोरा वडगाव रोठे, दहिगाव परिसरातील होत असलेल्या शेतकऱ्यांचे शेत पिकांचे नुकसान बाबत जिल्ह्याचे खासदार अनुप धोत्रे यांची शेतकऱ्यांनी भेट घेऊन निवेदनाद्वारे बंदोबस्त करण्याची मागणी निवेदन केली आहे.
परिसरातील शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. संपूर्ण उपजीविका ही निव्वळ आणि निव्वळ शेती च्या भरोशावर असून कुटुंबाचा कारभार हा शेतीवरच चालतो. मात्र मागील बरेच वर्ष पासून राण डुक्कर, रोही, हरिण यांची संख्या वाढली आहे.परिसरातील शेत पिकात वन्यप्राण्यांनी हैदोस घातला आहे. शेतकऱ्यांना दिवसा शेती कामे व रात्रीला शेत राखायचे काम करावे लागत आहेत. रात्री अपरात्री शेतात पिकांची नासाडी होवू नये याची चिंता राहते त्यामुळे शेतकऱ्यांची मानसिक स्थिती बिघडत असून कित्येक शेतकऱ्यांना हिंस्त्र वन्यप्राणी यांच्या हल्ल्यात जखमी व्हावे लागले. या सर्वांचा त्रास पाहता रोही, राण डुकरे तातडीने बंदोबस्त करावा. बंदोबस्त होत नसल्यास बुलढाणा जिल्ह्याप्रमाणेच आम्हालाही हिंस्त्र राणडुकरे तसेच रोहि यांना मारण्याची परवानगी मिळावी असेही निवेदनात म्हटले आहे.
अशा मागणी चे दहा गावातील शेतकऱ्यांच्या सह्या असलेले निवेदन खासदार अनुप धोत्रे यांना प्रत्यक्ष भेट घेऊन देण्यात आले. निवेदनाच्या प्रति पालकमंत्री आकाश फुंडकर,जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार,वन विभाग स्थानिक व वरिष्ठ अधिकारी यांना पाठविण्यात आले आहे.
निवेदनावर अनुप पाटील मार्के, मंगेश कोकाटे, रवी रोडे, सतीश भोंगळ, भाईजी, मोहन पाथ्रीकर, अनिल पाथ्रीकर, मनोज बोंद्रे, शिवा दही, अजय वाघ, विश्वनाथ मार्के,गणेश जुमळे, सिद्धार्थ दामोदर, प्रल्हाद दामोदर, राजेश पाटील, प्रकाश पाटील, नितीन पाटील, गजानन दही, अमोल राऊत इत्यादी सह दहा गावातील बहुसंख्य शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
