सेठ बन्सीधर विद्यालय शताब्दी महोत्सवांंतर्गत आयोजित राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत हजारो रूपयांची बक्षिसे वितरण.
संस्कृती वानखडे अकोला हिने पटकावले ११ हजाराचे प्रथम बक्षिस,२५८ बुद्धिबळ स्पर्धकांनी घेतला सहभाग.
सेठ बन्सीधर विद्यालय शताब्दी महोत्सवांंतर्गत आयोजित राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत हजारो रूपयांची बक्षिसे वितरण.
संस्कृती वानखडे अकोला हिने पटकावले ११ हजाराचे प्रथम बक्षिस,२५८ बुद्धिबळ स्पर्धकांनी घेतला सहभाग.

तेल्हारा येथील सेठ बन्सीधर विद्यालयाच्या शताब्दी महोत्सवाच्या सातव्या पुष्पांतर्गत आयोजित राज्यस्तरीय एक दिवशीय बुद्धिबळ स्पर्धा रविवार दि.२२जून२०२५ रोजी संपन्न झाली. या स्पर्धेत राज्यातून २५८ बुद्धिबळ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला असून अकोला येथील संस्कृती वानखडे हिने११ हजार रुपये प्रथम बक्षीसाचा मान मिळविला. ९ हजाराचे द्वितीय क्रमांकाचे बक्षीस राहुल वर्मा पुणे यांने पटकावले तर तृतीय क्रमांकाचे ७ हजाराचे बक्षीस अकोला येथील ओजस अंबेरे या स्पर्धकाने ,सहा हजार रुपये चौथे बक्षीस अविनाश जाधव अमरावती, ५ हजार रुपये पाचवे बक्षीस यथांश इंगोले अमरावती या स्पर्धकांनी पटकावले, ३ हजार रुपयांचे सहावे बक्षीस रुद्र घोडे नागपूर तर दोन हजार रुपये सातवे बक्षीस चिन्मय उंबरकार तेल्हारा या स्पर्धकांनी प्राप्त केले आहे.

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ २२जून२०२५ रोजी सेठ बन्सीधर दहिगावकर हायस्कूल एज्युकेशन सोसायटी तेल्हाराचे उपाध्यक्ष बेनी प्रसाद झूनझूनवाला यांच्या अध्यक्षते खाली सायंकाळी पार पडला.
प्रारंभी सरस्वती पूजन व स्वामी विवेकानंद तथा सेठ बन्सीधर झुनझुनवाला यांचे प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. पदवीधर मतदार संघाचे आमदार धीरज लिंगाडे, जनता बँक तेल्हारा शाखेचे अध्यक्ष अनिल अग्रवाल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मंचावर काँग्रेसचे युवा नेते महेश गणगणे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गजानन वानखडे, शहर अध्यक्ष अॅड. संदीप देशमुख, अनंत सोनमाळे ,डॉ अशोक बिहाडे, अजय गावंडे, विवेक खारोडे ,अॅड.रमेशचंद्र श्रावगी, अतुल ढोले, से. ब. दहिगावकर हायस्कूल एज्युकेशन सोसायटी तेल्हारा चे अध्यक्ष गोपालदास मल्ल, व्यवस्थापक तथा स्वामी विवेकानंद ज्ञानपीठाचे अध्यक्ष विठ्ठलराव खारोडे, संचालिका अश्विनीताई खारोडे, संचालक ओमप्रकाश झुनझुनवाला, संचालक तथा से. ब .प्राथ .शाळा तेल्हारा चे अध्यक्ष डॉ विक्रम जोशी, संचालक विष्णू मल्ल आदींची मंचावर उपस्थिती होती. संस्थेच्या वतीने मान्यवरांचे यशोचित स्वागत करण्यात आले. यावेळी विजेत्यांना बक्षीसे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आलीत. सर्वच स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व मेडल देण्यात आले.

संतोष गावंडे व अनुप उंबरकार यांनी कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम केले. तर चीफ ऑर्व्हेटर म्हणून सर्वश्री दीपक चव्हाण ,बाळू बोदडे, राहुल भारसाकळे, बाळासाहेब तायडे, बाळासाहेब कौसल,रवींद्र अंभोरे यांनी काम केले. सेठ बन्सीधर कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य गोपाल फाफट, स्वामी विवेकानंद ज्ञानपीठाच्या प्राचार्या रंजना भागवत, सेठ बन्सीधर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आशिष अग्रवाल, महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, निमंत्रित नागरिक, पत्रकार यांची यावेळी उपस्थिती होती. बक्षीस वितरण समारंभाचे सूत्रसंचालन मुकुंद सोनीकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रदीप राऊत यांनी केले.