डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जम्मू- काश्मीर मध्ये राष्ट्राची एकात्मता जपण्यासाठी प्राणांतिक संघर्ष केला – डॉ संजय शर्मा
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी बलिदान दिनानिमित्त अभिवादन सभा.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जम्मू- काश्मीर मध्ये राष्ट्राची एकात्मता जपण्यासाठी प्राणांतिक संघर्ष केला. – मान्यवरांचे अभिवादन.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी बलिदान दिनानिमित्त अभिवादन सभा.

तेल्हारा : डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी बलिदान दिनानिमित्त दि. २३ जुन रोजी तेल्हारा मंडळ भाजपा तर्फे आयोजित अभिवादन कार्यक्रमात भाजपा मा.तालुकाध्यक्ष गजानन उंबरकर व तेल्हारा मंडळ अध्यक्ष गणेश रोठे यांचा हस्ते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा तैलचित्राला मार्ल्यापण करुन आदरांजली वाहण्यात आली.

तेल्हारा येथील माजी नगराध्यक्ष अनिल पोहणे यांचा घरी हा कार्यक्रम झाला. भारताचे पहिले उद्योगमंत्री डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हे जनसंघाचे संस्थापक असून त्यांनी “एक देशात दोन विधान, दोन प्रधान आणि दोन निशाण चालणार नाहीत!” अशी स्पष्ट भूमिका मांडून जम्मू- काश्मीरमध्ये राष्ट्राची एकात्मता जपण्यासाठी प्राणांतिक संघर्ष केला, त्यांच्या देशाच्या एकात्मतेप्रती समर्पणाला मी विनम्र अभिवादन करतो असे डॉ संजय शर्मा यांनी केले,यावेळी भाजप मंडळ अध्यक्ष गणेश रोठे व माजी नगराध्यक्ष जयश्रीताई पुंडकर, कल्पना ताई पोहणे यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले.

यावेळी रवी गाडोदिया, विजय देशमुख, अनील कृष्वराव पोहने, अशोक गोयंनका, जेठमल मंत्री, सतिश जयस्वाल, गजानन गायकवाड, सुनील राठोड, मंगेश सोळंके, विठ्ठलराव पाडुरंग भाकरे,डॉ ऋषिकेश चोपडे, योगेश आप्पा बिडवे, वैभव दिपकराव पोहणे, सुनील भुजबले, वैभव पोटे, गणेश इंगोले, शिवा खाडे, विशाल ठाकरे, राजु पा गावंडे, केशव फ. गावंडे हे उपस्थित होते.