दि.अकोला – वाशिम जिल्हा मध्य. सहकारी बँके तर्फे तेल्हारा येथे ग्राहक प्रबोधन सभा संपन्न.
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 निमित्ताने ग्राहक प्रबोधन सभा.
दि.अकोला – वाशिम जिल्हा मध्य. सहकारी बँके तर्फे तेल्हारा येथे ग्राहक प्रबोधन सभा संपन्न.
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 निमित्ताने ग्राहक प्रबोधन सभा.

दि अकोला – वाशिम जिल्हा मध्य.सहकारी बॅंक शाखा तेल्हारा तर्फे ग्राहक प्रबोधन सभेचे माहेश्वरी भवन येथे दिनांक 22 जुन रोजी आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उदघाटन सहकार महर्षी कै.डॉ.वा.रा.उपाख्य अण्णासाहेब कोरपे यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून द्विपप्रज्वलणाने झाले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व उदघाटक कृषी उत्पन्न बाजार समिती तेल्हाराचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक संदिप खारोडे होते.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भाजपा जिल्हा उपाध्यक्ष केशवराव ताथोड ,जिनींग -प्रेसिंग तेल्हारा अध्यक्ष शेषराव पाथ्रीकर ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रमेशराव दारोकार,भरतराव बरिंगे, खरेदी विक्री संघ संचालक अरुण तेल्हारकर, प्रतिष्ठित नागरिक ठेवीदार गोपालदास राठी, गुणवंतराव खारोडे, मनोहरराव गडम तसेच तालुक्यातील विविध सेवा.सह.सोसायटिंचे अध्यक्ष जनार्धन नागोलकार , केशवराव ताथोड ,योगेश बिडवे, उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. केशवराव ताथोड यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना जिल्हा बॅंक शेतकरी, कष्टकरी, कामगार पगारदार यांच्यासाठी नेहमी तत्पर असते त्यामुळे शेतकरी सुद्धा या बँकेला आपली बॅंक मानतात बॅंक सुद्धा शेतकरी हिताचाच विचार करून सेवा प्रदान करते म्हणूनच बँकेने थकीत सभासद यांच्यासाठी संपूर्ण देशात नसेल अशी एकरकमी कर्ज परतफेड योजना जाहीर केली. हि बाब खरोखर कौतुकास्पद आहे तरी तालुक्यातील शेतकरी बांधवानी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.तर रमेश दारोकार यांनी शेतकरी बांधव यांची जिल्हा बॅंक हि आर्थिक विकासाचा आधारस्थंभ असून शेतकरी बांधव यांनी आपले कडील कर्ज नियमित भरावे व आपली उन्नती साध्य करावी असे मत मांडले.काम करत असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपली नाळ बँकेशी कायम ठेवा असे मत व्यक्त केले.
तर अध्यक्षीय मनोगतात संदिप खारोडे यांनी सेवा.सह.सोसायटी व जिल्हा बॅंक शेतकरी, ग्राहक, खातेदार, कर्जदार यांच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील राहून कार्य करत असते त्यामुळे माझी बॅंक जिल्हा बॅंक खरोखरंच माझी आहे अशी सेवा देते बँकेत पारिवारिक जिव्हाळा असल्याचे नमूद केले.जिल्हा बॅंक नेहमीच ग्राहकाभिमुख कार्य करतांना सभासद,खातेदार यांच्या हिताचा विचार करत असते त्यासाठी बँकेने ऐतिहासिक निर्णय घेऊन दि.1 एप्रिल 2025 पासुन खातेदार,कर्जदार यांना बँकेचे विविध प्रकारचे आकारल्या जाणारे अल्प दराचे खात्यावरील शुल्क पूर्णपणे रद्द केले आहे.तरी सर्वांनी बँकेच्या विविध आकर्षक दराच्या ठेव योजनेचा तसेच नाममात्र व्याज दराच्या जलसिंचन आणि इतर कर्जाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. ग्राहक सभेप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये मुख्याधिकारी तथा तेल्हारा तालुका प्रमुख .जी.एच.शिंदे यांनी बँकेची आतापर्यंत सर्वांच्या सहकार्याने यशस्वी झालेली वाटचाल, बँक देत असलेल्या सेवा,विविध आकर्षक ठेव व कर्ज योजना,थकीत सभासद यांच्यासाठी असलेली व्याज सवलत योजना,शेतकरी व पर्यावरण पुरक अल्प व्याजदराची ‘जिल्हा बॅंक ग्रामीण सूर्यघर योजना’ याबाबत विस्तृत माहिती देऊन विविध योजनाचा लाभ घेण्यासाठी तसेच सहकारी संस्था ह्या टिकल्या पाहिजे व या संस्थांची आर्थिक उन्नती झाली पाहिजे याकरिता सहकारतील पैसा सहकारातच गुंतवावा असे नम्र आवाहन उपस्थितांना केले. तर डिजिटल सुरक्षा याबद्दल पालक शाखाधिकारी अजय धोत्रे यांनी माहिती दिली.
सुत्रसंचलन एस.के.गाडगे यांनी व आभार प्रदर्शन मार्केटिंग ऑफिसर ग्रेड 2 अमोल वायाळ यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बँकेचे कर्मचारी व गटसचिव यांनी सहकार्य केले.कार्यक्रमास परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.