आपला जिल्हा अकोला

अकोल्याचा शिरपेचात मानाचा तुरा.,माळेगाव बाजार शाळेचे मुख्याध्यापक सचिन ठोमरे यांना ‘राज्यस्तरीय सेवा सन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर. 

अकोल्याचा शिरपेचात मानाचा तुरा.,माळेगाव बाजार शाळेचे मुख्याध्यापक सचिन ठोमरे यांना 'राज्यस्तरीय सेवा सन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार' जाहीर. 

अकोल्याचा शिरपेचात मानाचा तुरा.,माळेगाव बाजार शाळेचे मुख्याध्यापक सचिन ठोमरे यांना ‘राज्यस्तरीय सेवा सन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर.

        महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या वतीने दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘राज्यस्तरीय सेवा सन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील PM श्री जि. प. मराठी वरिष्ठ प्राथमिक केंद्रशाळा, माळेगाव बाजार चे मुख्याध्यापक सचिन तुळशिराम ठोमरे यांना घोषित करण्यात आला आहे. त्यांच्या या निवडीमुळे शिक्षण क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

       निवड पत्राचे दिमाखदार वितरण –

       आज शनिवार, ७ मार्च २०२६ रोजी आयोजित एका विशेष कार्यक्रमात सचिन ठोमरे सरांना अधिकृत निवड पत्र प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे राज्य समन्वयक भास्कर डोसे आणि संजय बावस्कार मुख्याध्यापक आदर्श विद्यालय शेलगाव मुकुंद यांच्या शुभहस्ते हे निवड पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

       शैक्षणिक योगदानाची दखल सचिन ठोमरे सरांनी माळेगाव बाजार शाळेचा कायापालट करण्यात आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवलेल्या विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ‘PM श्री’ शाळेच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा उंचावण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत.

हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून माझ्या शाळेतील विद्यार्थी, सहकारी शिक्षक आणि पालकांच्या विश्वासाचे प्रतीक आहे. यामुळे भविष्यात अधिक जोमाने कार्य करण्याची ऊर्जा मिळाली आहे. – सचिन ठोमरे

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!