शेतकरी जागर मंच चे कर्जमुक्ती व विविध मागण्यासाठी अन्नत्याग आंदोलन.
तहसील परिसरात शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती.
शेतकरी जागर मंच चे कर्जमुक्ती व विविध मागण्यासाठी अन्नत्याग आंदोलन,तेल्हारा तहसील परिसरात शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती.

शेतकरी जागर मंच व तेल्हारा तालुक्यातील शेतकरी यांच्या वतीने तेल्हारा तहसील परिसरात दि. 8 मे रोजी शेतकरी कर्जमुक्ती व विविध शेतकरी हिताच्या मागण्यासाठी एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.
शेतकरी जागर मंचाने मागील 15 दिवसात तेल्हारा तालुक्यातील जवळपास 60 गावात शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी, शेतमाल हमीभाव कायदा, सोयाबीन प्रतिक्विंटल 6 हजार रुपये भाव, हरभरा प्रतिक्विंटल 8 हजार,कापूस 10 हजार,तुर 12 हजार प्रतिक्विंटल भाव मिळालाच पाहिजे, स्वामिनाथन आयोगाने सुचविलेले धोरण अवलंबिले जावे, शेती संबधित औजारे व इतर शेती उपयोगी वस्तू जीएसटी मुक्त करावे, पिक कर्ज परतफेड बारा महिने ची करावे, पिक कर्ज प्रति हंगामात 40000 रूपये करण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी गावात जागर केला. गावा गावात सभा, बैळकी घेऊन शेतकऱ्यांना शासकीय धोरण व कर्जमुक्ती बाबतीत उदासीनता सांगून पुढील शेतकरी धोरण ठरविण्यासाठी शेतकऱ्यांनी एकीकरण करणे गरजेचे आहे, आपल्या पिकाचा भाव ठरविण्याचे अधिकार शेतकऱ्यांना मिळावे या व इतर शेतकरी हिताच्या मागण्यासाठी ठिक ठिकाणी सभा घेण्यात आल्या.

शेतकरी जगाराचा पुढील टप्पा म्हणून गुरुवार दि. 08.05.2025 रोजी सकाळी 11.00 वा. पासुन 04.00 वा. पर्यंत एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन तहसील कार्यालय परिसरात करण्यात आले.यावेळी सर्व शेतकरी पुत्र तेल्हारा तालुक्याच्या तहसील कार्यालयासमोर आपल्या हक्कासाठी व आपल्या इमानदार बापाचा आवाज बुलंद करण्यासाठी तहसील परिसरात शेतकऱ्यांचे युवा पुत्र एकत्र येताना दिसले. यामध्ये आपल्या बापा सोबत शेतात राबणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांपासून तर उच्य शिक्षण घेवून आपल्या कष्टकरी बापाच्या कष्टाची जाण असणाऱ्या युवकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हजेरी लावलेली दिसली. यावेळी विविध क्षेत्रातील शेतकरी, युवक, सर्वसामान्य घटकांनी आपले विचार मांडून आपल्या मनातील खदखद, शासन विरोधी तिव्र भावना व्यक्त केल्या. दिवसभर तहसील परिसरात शेतकरी ठाण मांडून बसले होते. दुपारी 4 वाजता विविध प्रकारच्या घोषणा देत शेतकरी जागर मंच पदाधिकारी व गावा गावातून आलेल्या शेतकऱ्यांनी विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार समाधान सोनवणे यांना देण्यात आले. यावेळी शेतकरी जागर मंच अकोला चे प्रशांत गावंडे,अक्षय राऊत,रवि पाटील अरबट,युवावक्ता रोषण अहेरकर, तुषार कोरडे,सौ संजीवनी बिहाडे,रमेशराव ताथोड,पुरूषोत्तम दहे,अशोक नराजे,अतुल ढोले, हरिदास वाघ,प्रशांत देशमुख,अॅड संदीप देशमुख, शेतकरी संघटनेचे लक्ष्मीकांत कोठेकर, गणेशराव बिहाडे,शेषराव पाथ्रीकर, अॅड पवन शर्मा,अनंत सोनमाळे,मंगेश दुतोंडे इत्यादी सह शेकडो शेतकरी उपस्थित होते.