आंदोलनआपला जिल्हा

तेल्हाऱ्यात स्वराज्य पक्षाच्या आसुड मोर्चात शेतकऱ्यांचा अफाट जनसागर. कर्जमाफीचे आश्वासन पाळा, अन्यथा मंत्र्यांना बदडून काढू – प्रशांत डिक्कर

तेल्हाऱ्यात स्वराज्य पक्षाच्या आसुड मोर्चात शेतकऱ्यांचा अफाट जनसागर. कर्जमाफीचे आश्वासन पाळा, अन्यथा मंत्र्यांना बदडून काढू - प्रशांत डिक्कर

तेल्हाऱ्यात स्वराज्य पक्षाच्या आसुड मोर्चात शेतकऱ्यांचा अफाट जनसागर.
कर्जमाफीचे आश्वासन पाळा, अन्यथा मंत्र्यांना बदडून काढू – प्रशांत डिक्कर

तेल्हारा, दि. २९ सप्टेंबर २०२५ : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आणि विविध मागण्यांसाठी आज स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात तेल्हारा तालुक्यात रेकॉर्डब्रेक आसुड मोर्चा काढण्यात आला. हजारो शेतकरी आणि शेतमजूर सहभागी झाले असून, सरकारला निवडणूक आश्वासनांची आठवण करून देण्यात आली. आश्वासन पाळली नाहीत तर शेतकऱ्यांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही डिक्कर यांनी दिला.मोर्चाची सुरुवात सकाळी ११ वाजता टॉवर चौकातून बैलगाड्यांसह झाली. हजारो शेतकऱ्यांच्या लक्षणीय उपस्थितीत हा मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत पोहोचला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. स्वराज्य पक्षाच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. गजानन पाटील बंगाळे, रुषिपाल महाराज, अरविंद तिवाणे आणि उज्वल पाटील चोपडे यांनी बोलताना शेतकऱ्यांच्या समस्या आणि सरकारच्या उपेक्षेचे वर्णन केले.

मुख्य सभेत बोलताना प्रशांत डिक्कर यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला. “सरकारने निवडणुकीत दिलेली कर्जमाफीची आश्वासने अंमलात आणली नाहीत. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. आश्वासन पाळली नाहीत तर मंत्र्यांना बदडून काढू. शेतकऱ्यांचा उद्रेक रोखणे शक्य होणार नाही,” असे डिक्कर यांनी स्पष्टपणे सांगितले.

मोर्च्यात शेतकरी आणि शेतमजुरांच्या विविध प्रश्नांवर भर देण्यात आला. संपूर्ण जिल्हा ओला दुष्काळाच्या छायेखाली असल्याने कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच, शेतमजुरांसाठी स्वतंत्र शेतमजूर कल्याण महामंडळ स्थापन करण्यात यावे. विमा कंपन्यांनी दिरंगाई न करता पिक विम्याची रक्कम तात्काळ वितरित करावी, ही प्रमुख मागणी होती. या सर्व मागण्यांचे निवेदन तहसीलदार सोनवणे यांच्याकडे सुपूर्द केले. तहसीलदार समाधान सोनवणे यांनी शेतकऱ्यांसमोर येऊन निवेदन स्वीकारले. “शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविले जाईल. त्यावर त्वरित कारवाई होईल,” असे आश्वासन देऊन त्यांनी शेतकऱ्यांना मनापासून धन्यवाद मानले.या मोर्चात शेतकऱ्यांची प्रचंड उपस्थिती होती.

बैलगाड्या, घोषणाबाजी आणि पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी हा मोर्चा ऐतिहासिक बनवला. स्वराज्य पक्षाने या मोर्चाला यश मिळवून दिले असून, शेतकरी नेत्यांकडून याबाबत समाधान व्यक्त करण्यात आले. यापुढेही शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष चालू राहील, असा निर्धार डिक्कर यांनी व्यक्त केला. यावेळी स्वराज्य पक्षाचे कुलदीप बाजारे,गणेश आमले, मुन्ना पाटील पाथ्रीकर, रोहित ताथोड, मुन्ना बिहाडे, आशिष शेळके पदाधिकारी, कार्यकर्ता सदस्यांसह शेतकऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!