आपला जिल्हा

बोगस बियाणे, खत लिकेंजसारख्या प्रकारांना तत्काळ आळा घाला – आमदार रणधीर सावरकर.

अकोला खरीपपूर्व आढावा बैठकीत निर्देश.

बोगस बियाणे, खत लिकेंजसारख्या प्रकारांना तत्काळ आळा घाला – आमदार रणधीर सावरकर.
अकोला खरीपपूर्व आढावा बैठकीत निर्देश.

अकोला, दि. ५ : बोगस बियाण्यांची कुठेही विक्री होता कामा नये. त्याचप्रमाणे, रासायनिक खतासोबत इतर उत्पादनांचे लिंकेजही कुठे होऊ नये. या संदर्भातील तक्रारींचे तत्काळ निवारण करावे, असे निर्देश आमदार रणधीर सावरकर यांनी आज येथे दिले.

अकोला तालुका स्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक आमदार रणधीर सावरकर यांच्या अध्यक्षतेत नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार अमोल मिटकरी, कृषी विभागाचे विविध अधिकारी, स्थानिक प्रशासन आणि शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. बोगस बियाण्यांची विक्री, खतांचे लिंकेज, शेतकऱ्यांचे नुकसान, नवीन तंत्रज्ञानाचा वापर आदी विषयांवर सखोल चर्चा झाली.

आमदार श्री. सावरकर म्हणाले की, कृषी निविष्ठांचा साठा व पुरवठ्याबाबत सजग राहून संनियंत्रण करावे. शेतकरी बांधवांची कुठेही फसवणूक होता कामा नये. घरगुती बियाण्याचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचनाही त्यांनी केली.
तालुकास्तरावर ई-केवायसी शिबिरे आयोजित करावीत जेणेकरून प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना फायदा मिळेल. ‘अ‍ॅग्रीस्टॅक’ पोर्टलवरील नोंदणीबाबत सर्वदूर जनजागृती करावी. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेत ३५ टक्के अनुदान देण्यात येते. अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

बियाणे, खते यांची साठेबाजी टाळावी. पीक नुकसानीचे सर्वेक्षण तत्काळ व्हावे.पीक विमा योजनेत खरबुजाचे उत्पादन समाविष्ट करावे, बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागते त्यामुळे संपूर्ण बियाण्यांच्या मागणीच्या १० टक्के साठा जास्तीचा राखीव ठेवण्यात यावा. रेशीम शेती वाढवण्यासाठी कार्यशाळा घेण्यात याव्यात. असे निर्देश आमदार श्री. मिटकरी यांनी दिले.

लिंबू, संत्रा, हळद, तीळ आणि भाजीपाला आदी पीकांचे चांगले उत्पादन घेणा-या शेतकरी बांधवांचा यावेळी सत्कार करण्यात आला. किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पत्रकांचे वाटप करण्यात आले. गुणवंत कृषी कर्मचाऱ्यांनाही यावेळी गौरविण्यात आले.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!