संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ लाभार्थी यांना महत्त्वाचे आवाहन.
तहसीलदार तेल्हारा समाधान सोनवणे यांचे कडून सूचना,तापता उन्हाळा पाहता कार्यालयात येताना घ्या काळजी.
संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ लाभार्थी यांना महत्त्वाचे आवाहन.
तहसीलदार तेल्हारा समाधान सोनवणे यांचे कडून सूचना,तापता उन्हाळा पाहता कार्यालयात येताना घ्या काळजी.

तेल्हारा दि. 24
तहसील कार्यालय तेल्हारा येथील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना या योजनेतील लाभार्थ्यांना त्यांचे अर्थसहाय्य वितरण डीबीटी पोर्टल द्वारे करण्याचा शासन स्तरावर निर्णय घेण्यात आला आहे. सदर योजनेत लाभार्थ्यांना त्यांचे आधार सलग्न कोणत्याही बँकेच्या कोणत्याही खात्यामध्ये शासनाद्वारे अनुदानाची रक्कम जमा करण्यात येते. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांची डीबीटी पूर्ण झालेले आहे त्यांनी त्यांचे आधार संलग्न बँकेमध्ये अनुदान प्राप्त झाले किंवा नाही याची खात्री करावी. ज्या लाभार्थ्यांना मागील दोन-तीन महिन्यापासून योजनेचे अनुदानाचा लाभ मिळालेला आहे त्यांनी आज रोजी पर्यंत बँकेच्या नोंदी असलेले पुस्तक बँक पासबुक, आधार कार्ड व आधार कार्ड सोबत जोडलेला मोबाईल नंबर संजय गांधी निराधार योजना विभाग तहसील कार्यालय तेल्हारा येथे कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावे. ज्या लाभार्थ्यांच्या आधार कार्ड ला मोबाईल क्रमांक सलग्न केलेला नसल्यास त्यांनी जवळच्या आधार केंद्रावर जाऊन आधार अपडेट करून घ्यावे. बऱ्याच वेळा इंटरनेट सुविधा किंवा डीबीटी पोर्टल द्वारे तांत्रिक अडचणीमुळे लाभार्थ्यांना याचा बराच वेळ लागू शकतो.
सबब कोणत्याही कार्यालयात देताना घरून जेवण करून किंवा न्याहारी सोबत आणावी. संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांचे वयोमान तसेच वातावरणात उष्णतेचे वाढलेले प्रमाण पाहता सदर डीबीटी प्रक्रिया करता लाभार्थी यांनी स्वतः एकटे न येता स्वतःचा मुलगा किंवा नातेवाईक यांच्यासोबत आधार कार्ड, बँक पासबुक तसेच आधार कार्डला संलग्न केलेला मोबाईल कार्यालयात सादर करण्याचे आवाहन तहसीलदार तेल्हारा समाधान सोनवणे यांनी केले आहे.
उपरोक्त नमुद सर्व बाबीचे पालन करून प्रशासनात सहकार्य करावे जेणेकरून आपल्या अमूल्य वेळेची बचत होईल व शासकीय मदत आपणास वेळेवर प्राप्त होईल असेही तहसीलदार समाधान सोनवणे यांनी कळविले आहे.