इतिहास हा प्रगतीचा नवा उन्मेष :ॲड.पुरूषोत्तम खेडेकर
इतिहासकार वासुदेव सिताराम बेंद्रे इतिहास अकादमी प्रदेश कार्यकारणी आभासी सभा.
इतिहास हा प्रगतीचा नवा उन्मेष :ॲड.पुरूषोत्तम खेडेकर
इतिहासकार वासुदेव सिताराम बेंद्रे इतिहास अकादमी प्रदेश कार्यकारणी आभासी सभा.

इतिहास हा नव्या पिढीच्या प्रगतीचा मार्ग ठरू शकतो.नवा इतिहास रोज घडतो आहे.प्राचीन ,मध्ययुगीन, अर्वाचीन इतिहास हा जरी आपला मोठा ठेवा असला तरी रोज नवा इतिहास घडवण्याची धमक नव्या पिढीत दिसून येत असून त्यामुळे अंतराळात नऊ महीणे घालवून परतणारी सुनिता विल्यम असो वा कृषीप्रधान भारतातली शेतकरी आत्महत्या असो अर्थव्यवस्थेची मुलके बदलणारी काल घडणारी प्रत्येक घटना ही इतिहास घडवू पाहते आहे.त्यामुळे इतिहासाच्या अभ्यासाची प्राचीन पद्धती बदलत असून दररोज प्रचंड शोध पुढे येत आहेत. कालचे संदर्भ आज लागू होतीलच असे नाही त्यामुळे इतिहास अभ्यासाची सुत्रे सतत अद्यावत ठेवण्याची व इतिहासाची मांडणी अद्यावत ठेवण्याची जबाबदारी इतिहास अभ्यासकांवर व पर्यायाने अकादमींवर येत असून नव्या पिढीसाठी इतिहास हा नवा उन्मेष ठरू पाहत असल्याचे मत ॲड पुरूषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केले आहे.
इतिहासकार वासुदेव सिताराम बेंद्रे इतिहास अकादमी प्रदेश कार्यकारणी आभासी सभा संस्थापक अध्यक्ष पुरूषोत्तमजी खेडेकर यांचे अध्यक्षतेत व श्री शिखरे यांचे प्रमुख उपस्थितीत नुकतीच सभा संपन्न झाली ..सभेस इ.वा.सि.बेद्रे इतिहास अकादमीचे प्रदेश अध्यक्ष प्रा डॉ विलास वसंतराव पाटील(नंदुरबार)
उपाध्यक्ष
प्रा डॉ राजेंद्र साहेबराव धाये(जालना),
प्रा डॉ नारायण बाबूराव सूर्यवंशी(लातूर)
प्रदेश सचिव
संघर्ष प्रभाकरराव सावरकर(अकोला)
,कार्याध्यक्ष
प्रा डॉ अमृत साळुंखे(सातारा),
कोषाध्यक्ष
प्रा डॉ अनिल साहेबराव पाटील(जळगांव),
संघटक
प्रा डॉ राहुल भालेराव पाटील(पालघर),
कार्यकारी सदस्य प्रा डॉ खासेराव हिम्मतराव पाटील(धुळे)
,शिवप्रकाश यादव,उत्तर प्रदेश उपस्थित होते .
या सभेत विविध विषयांवर विचारमंथन करण्यात येवून इतिहास अकादमीची पुढील दिशा निश्चीत करण्यात आली ,असे
संघर्ष प्रभाकरराव सावरकर
प्रदेश सचिव
इतिहासकार वासुदेव सिताराम बेंद्रे इतिहास अकादमी (महाराष्ट्र प्रदेश) कळवतात.