जिवंत सातबारा मोहीमेत सहकार्य करून नोंद करा.
तहसीलदार तेल्हारा यांचे आवाहन.

तेल्हारा दि.-24
शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत जिवंत सातबारा मोहीम राबवणे बाबत महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभाग अंतर्गत जिवंत सातबारा मोहीम राबवणे बाबत निर्देश आहेत. सदरचे अनुषंगाने तेल्हारा तालुक्यातील सर्व गावातील सर्व मयत खातेदारांच्या वारसांना नोंदीची प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. मयत खातेदार यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसाची नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखांमध्ये नोंद न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागते या दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यात जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचा निर्णय शासन स्तरावरून घेण्यात आलेला आहे.
त्या अनुषंगाने तेल्हारा तालुक्यातील सर्व शेतकरी यांना आवाहन करण्यात येते की त्यांचे सातबारा मध्ये मयत व्यक्तीचे वारसा संबंधी आवश्यक सर्व खालील प्रमाणे कागदपत्रे त्यांनी महसूल अधिकारी तलाठी यांचे कडे तात्काळ सादर करावे. जेणेकरून शेतकऱ्यांना अडचणी येणार नाहीत. आवश्यक कागदपत्रांमध्ये मृत्यू दाखला, वारसा बाबत सत्य प्रतिज्ञालेख, स्वयंघोषणापत्र, पोलीस पाटील/ सरपंच/ ग्रामसेवक यांचा दाखला त्यामध्ये सर्व वारसाचे नाव पत्ता दूरध्वनी क्रमांक आवश्यक आहे.,रहिवासी पुरावा सादर करावाच आहे. त्या अनुषंगाने तेल्हारा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना तहसीलदार तेल्हारा समाधान सोनवणे त्यांच्याकडून आवाहन करण्यात येते की ई हक्क प्रणालीतून अर्ज करून जिवंत सातबारा मोहिमेत सहभागी व्हावे व योजनेत सहकार्य करावे.