तेल्हारा सेठ बन्सीधर विद्यालय शताब्दी महोत्सवी समारोप थाटामाटात संपन्न.
आमदार प्रकाश भारसाकडे यांची उपस्थिती.
तेल्हारा सेठ बन्सीधर विद्यालय शताब्दी महोत्सवी समारोप थाटामाटात संपन्न.
आमदार प्रकाश भारसाकडे यांची उपस्थिती.

सेठ बन्सीधर विद्यालय शताब्दी महोत्सव दरम्यान माजी विद्यार्थी स्नेह मिलन सोहळा या कार्यक्रमा चे समारोपीय कार्यक्रम दिनांक 23 मार्च 2025 ला से.ब. विद्यालय तेल्हारा येथे संपन्न झाला. या समारोपीय कार्यक्रमाला मतदारसंघ आमदार प्रकाश पाटील भारसाकडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी मुंबई,पुणे,नाशिक,इंदोर इत्यादी ठिकाणाहून विद्यार्थी सहभागी झाले होते.व्यासपीठावर संस्थेचे संचालक मंडळ व मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या प्रसंगी आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांचा संचालक मंडळाने शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

तसेच शाळेच्या माजी विद्यार्थिनी अश्विनीताई नेमाडे अमरावती येथे उपशिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत यांचा देखील शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.बेलखेड चे सुपुत्र डॉ. शंकरराव पुंडलिकराव राऊत पुणे,पंचशील भोपळे मुंबई, सुनंदा जोशी पुणे,श्री सोनीकर, सुशीला ताई कर्णिक यवतमाळ, डॉ. विजय बिहाडे अकोला यासारख्या माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच शताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष गोपालदास मल्ल यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष गावंडे यांनी केले तर सूत्रसंचालन अनुप उंबरकार आणि आभार प्रदर्शन नितीन बनकर यांनी केले. कार्यक्रमाचा शेवट पसायदानाने झाला.
यावेळी सन 1999-2001 चे एस. एस. सी. माजी विद्यार्थी यांनी संस्थेच्या वाचनालयास पुस्तक कपाट व कपाटात बसतील एवढी विविध वाचनीय पुस्तके भेट दिली यावेळी संस्थेच्या संचालक मंडळाने माजी विद्यार्थी यांचे कौतुक करून सत्कार केला.