आपला जिल्हा
सेठ बन्सीधर विद्यालय शताब्दी महोत्सवात ऐतिहासिक नाणी आणि वस्तू प्रदर्शनास उत्तम प्रतिसाद.
परंपरा जोपासणारे नाणे व विविध वस्तू संग्राहक सुधीर देशमुख, डॉ. मोहसीन कुरेशी व चेतन पाडिया
सेठ बन्सीधर विद्यालय शताब्दी महोत्सवात ऐतिहासिक नाणी आणि वस्तू प्रदर्शनास उत्तम प्रतिसाद.
परंपरा जोपासणारे नाणे व विविध वस्तू संग्राहक सुधीर देशमुख, डॉ. मोहसीन कुरेशी व चेतन पाडिया

- तेल्हारा तालुक्यातील भांबेरी येथील रहिवाशी तथा भारत विद्यालयातील शिक्षक सुधीर यादवराव देशमुख तसेच तेल्हारा शहरातील डॉक्टर मो मोहसीन कुरेशी व चेतन पाडिया यांनी ऐतिहासिक नाणी , नोटा व इतर वस्तू जपण्याची परंपरा छंद म्हणून जोपासली आहे. से.ब. विद्यालयात शताब्दी महोत्सवात सदर वस्तूंची भरविलेली प्रदर्शनी प्रशंसनीय ठरली आहे.

- विविध ठिकाणाहून आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी, आजी-माजी सैनिकांनी माजी व विद्यमान मुख्याध्यापक शिक्षक यांनी प्रदर्शनीस भेट देऊन नाणेसंग्राहकांची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
नाणे संग्रा याहक सुधीर देशमुख यांनी सन१९७७ साली विविध वस्तू जमविल्या त्यात इसवीसन पूर्व २०० वर्षातील नाणी, चंद्रगुप्त मौर्य कालीन नाणी, ४ हजार आगपेटी पेरणीचे चाडे,१८६० पासून खरेदी, शिवकालीन, खंजीर, तलवार, भाले, आदिवासी दागिने, हस्तलिखित पोथी अशा विविध ऐतिहासिक नाण्यांच्या व वस्तूंचा संग्रह केला आहे. छंद जोपासण्याची स्फूर्ती त्यांना नातेवाईकांकडून मिळाली असे त्यांनी सांगितले. हा वारसा सांभाळत असताना त्यांनी सेवाभावना प्रत्यक्षअंगिकारली. आदिवासी बांधवांना मेडिकल सुविधा पुरविण्याचे काम सुधीर देशमुख ह्यांनी केले आहे. 
- तर डॉक्टर मोहसीन कुरेशी व चेतन पाडिया यांनीही सुधीर देशमुख यांच्याप्रमाणेच ईस्ट इंडिया कंपनीची सन१८०४ पासून तर स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची २००८ सालापर्यंतची सर्वच लहान मोठी नाणी संग्रहित करून प्रदर्शित केली आहेत. तांबे, पितळ, चांदी नाणे संग्रहात ईस्ट इंडिया कंपनीची प्रतिमा असलेली भगवान महावीर, श्रीराम, लक्ष्मण व हनुमान, श्री गणेश, दुर्गा माता यांची प्रतिमा असलेली नाणी आहेत. याशिवाय महाराजा यशवंतराव होळकर, संभाजीराव गायकवाड, हैदराबाद व ग्वाल्हेर घराण्याची नाणीही संग्रहात आहेत.
चेतन पाडिया यांचे कडे गतकाळातील, कॅलेंडर, पाकिटे, अंतर्देशीय पत्र, देश विदेशातील नोटा व नाणी, जुने स्टॅम्प पेपर यासह विविध वस्तूंचा संग्रह आहे. ही परंपरा कुटुंबीय पुढे चालू ठेवतील अशी आशा नाणे संग्रह यांनी बोलून दाखविली आहे.