सेठ बंसीधर विद्यालयाच्या शताब्दी सोहळ्यात गरजला दादासाहेब खंडाळकर यांचा पोवाडा.
शताब्दी महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम रेलचेल.
सेठ बंसीधर विद्यालयाच्या शताब्दी सोहळ्यात गरजला दादासाहेब खंडाळकर यांचा पोवाडा.
शताब्दी महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम रेलचेल.

तेल्हारा शहरातील
सेठ बंसीधर विद्यालय शताब्दी महोत्सव दरम्यान दि.२२ मार्च रोजी आयोजित कार्यक्रमात मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.मान्यवराच्या सत्कारा नंतर, कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खास करून उपस्थित झालेलें ,विशेषतः ८०ते ९०वर्ष वयोगटातील वयोवृद्ध असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा शिक्षकांच्या बद्दलच्या भावनिक मनोगताने, त्यांच्या कटु गोड अनुभवाने उपस्थित आजी, माजी विद्यार्थी, श्रोते भाराऊन गेले.दुपारच्या सत्रात अनेकांनी आपल्या कला सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.तर संध्याकाळच्या सत्रात ७५ते ८०वयोगटातील दहीगांव येथील माजी विद्यार्थी शाहिर दादासाहेब खंडाळकर यांनी सेठ बंसीधर विद्यालयाचा गौरवशाली इतिहास सांगणारा व या विद्यालयात मोलाची अशी कामगिरी करणार्या अकरा मान्यवरांच्या नावांची गुंफन करुन पोवाड्याची सुंदर रचना केली.

अगदी खड्या आवाजात पोवाडा गजाननराव मानकर यांनी सादर करून उपस्थितांची मने जिंकली.त्यांना साथ संगत शामराव भारसाकळे, शंकरराव जुमळे, विष्णूदास मानकर हार्मोनियम हरीभाऊ खंडाळकर , तबला, प्रसाद महेश खंडाळकर यांची लाभली, तर पुर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सुनिता काकड,सौ गावंडे यांनी केले. त्या नंतर माजी विद्यार्थ्यांचे व्याख्यान, मनोगत, गितगायन, नृत्य आणी कविसंमेलनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.