तेल्हारा येथे प्रा. वसंतराव हंकारे यांची जाहीर व्याख्यान.
महिला व युवक युवतींची उपस्थिती लक्षणीय.
तेल्हारा येथे प्रा. वसंतराव हंकारे यांची जाहीर व्याख्यान.
महिला व युवक युवतींची उपस्थिती लक्षणीय.

डॉ. गोपाळराव खेळकर महाविद्यालय येथे स्वर्गीय भिकाजी शंकर इंगळे बहुउद्देशीय शिक्षण संस्था गाडेगाव व डॉ. गोपाळराव खेळकर महाविद्यालय गाडेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवार दिनांक 22 मार्च 2025 रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता युवा व्याख्याते, लेखक, समाज परिवर्तनकार प्राध्यापक वसंतराव हंकारे यांच्या जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले. आयोजित कार्यक्रमात विचारपिठावर महाविद्यालय प्राचार्य डॉ गोपाल ढोले, प्रा. सुधाकरराव येवले, समाधान भिकाजी इंगळे, गाडेगाव सरपंच प्रमोद वाकोडे,प्रा.माहोरे उपस्थित होते.
दोन तास चाललेल्या व्याख्यानात न समजलेले आईबाप या विषयावर काळजाला भिडणारे व्याख्यान प्रा. वसंतराव हंकारे यांनी केले. जीवनात नक्कीच बदल घडवून आणणारे,आपल्याकरिता आईबाप काय करतात आणि आपण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे याची योग्य भावनिक मार्गदर्शन या व्याख्यानातून केले. प्रास्ताविक महाविद्यालय चे प्राचार्य डॉ गोपाल ढोले, संचालन चिकटे सर यांनी केले.
यावेळी शहरासह तालुक्यातील मोठा युवा, युवती वर्ग, आई वडील यांची उपस्थिती लक्षणीय होती.