वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई जयंती साजरी.
वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई जयंती साजरी.
वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई जयंती साजरी.

त्यागमूर्ती माता रमाई जयंती तेल्हारा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे तेल्हारा तालुका महिला आघाडीच्या वतीने साजरी करण्यात आली.
यावेळी सर्व प्रथम तथागत भगवान बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचे पुतळ्यांना उपस्थित पदाधिकारी यांनी हाराअर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर माता रमाई यांचे फोटोचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी विद्याताई शामस्कार महिला आघाडी तेल्हारा तालुका अध्यक्ष, कल्पनाताई हिवराळे शहर अध्यक्ष, सौ.कान्होपात्राताई फाटकर नगर सेविका,कवरताई,दारोकार ताई, सौ.मीराताई बोदडे माजी सरपंच तथा ग्रामसवांद सरपंच संघटना तेल्हारा तालुका अध्यक्ष, प्रियंकाताई खिरोडकर,अशोक दारोकार तेल्हारा तालुका अध्यक्ष, सिद्धार्थ शामस्कर विद्वत सभा समन्वयक ,प्रवीण पोहरकर, अण्णा मोहोड माजी पंचायत समिती सदस्य,जीवन इंगळे,जीवन बोदडे, आर.बी. वाकोडे, कैलास ठोकणे नगर परिषद सदस्य,रामभाऊ फाटकर पत्रकार, पंकज कंवर, प्रा.विकास दामोदर,आनंद बोदडे,संजय तायडे, राजु वरठे , विनाताई मोहोड, विद्याताई पोहरकर यांचे सह अनेक महिला कार्यकर्त्या यांची उपस्थिती होती.