आंदोलनआपला जिल्हा अकोला

इंधन दरवाढी, महागाई आणि टंचाई विरोधात २५ मे रोजी वंचितचा अकोल्यात भव्य ‘बैलगाडी मोर्चा’; नियोजनासाठी सर्व तालुक्यांत बैठकांचे सत्र!

इंधन दरवाढी, महागाई आणि टंचाई विरोधात २५ मे रोजी वंचितचा अकोल्यात भव्य 'बैलगाडी मोर्चा'; नियोजनासाठी सर्व तालुक्यांत बैठकांचे सत्र!

इंधन दरवाढी, महागाई आणि टंचाई विरोधात २५ मे रोजी वंचितचा अकोल्यात भव्य ‘बैलगाडी मोर्चा’; नियोजनासाठी सर्व तालुक्यांत बैठकांचे सत्र!

अकोला: केंद्र सरकारच्या नाकर्तेपना आणि चुकीच्या धोरणांमुळे पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. गोरगरीब सामान्य जनतेला आज इंधन, अन्नधान्य, तेल जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करणे अशक्य झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः जनतेला पेट्रोल-डिझेल, खाद्य तेल, खते बचतीचे आणि वर्क फ्रॉम होम, सोने चांदी खरेदी न करण्याचे आवाहन करतात, मात्र स्वतः ते आणि भाजपवाले शेकडो गाड्यांचा ताफा, मोठ्या रॅली आणि कार्यक्रम घेत उधळपट्टी करत आहेत. जनतेसाठी एक नियम आणि सत्ताधाऱ्यांसाठी वेगळा नियम, या दुटप्पी भूमिकेचा आणि वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक २५ मे २०२६ रोजी अकोला येथे पक्ष कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी ९ वाजता भव्य ‘बैलगाडी मोर्चा’ काढणार आहे.

या ऐतिहासिक मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी आणि तालुकास्तरीय नियोजनासाठी अकोला जिल्ह्यातील सात तालुके आणि महानगरमध्ये विशेष बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.

वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय कार्यकारणी सदस्या, अरुंधतीताई सिरसाट, प्रदेश उपाध्यक्ष डॉ धैर्यवर्धन पुंडकर, प्रदेश युवक आघाडी महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे,जिल्हा समन्वयक खतीब साहेब, विभागीय महासचिव बालमुकुंद भिरड यांच्या प्रमुख उपस्थितीत या बैठका पार पडणार आहेत. तालुकानिहाय बैठकांचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे.

२१ मे २०२६: तेल्हारा (सकाळी ११:०० वा.) शासकीय विश्रामगृह तेल्हारा 

|अकोट (दुपारी १:३० वा.)शासकीय विश्रामगृह अकोट

 २२ मे २०२६: मूर्तीजापूर (सकाळी ११:०० वा.)शासकीय विश्रामगृह मूर्तिजापूर 

| बार्शी टाकळी (दुपारी १:३० वा.) मानकर कॉम्प्लेक्स मंगरूळपीर रोड बार्शीटाकळी

 २३ मे २०२६: बाळापूर (सकाळी ११:०० वा.)पंचायत समिती सभागृह बाळापुर

| पातूर (दुपारी १:३० वा.)शासकीय विश्रामगृह पातुर

 २४ मे २०२६: अकोला तालुका आणि महानगर (अकोला येथे दुपारी १२:३० वा) अशोक वाटिका अकोला

बैठकीला प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, युवक अध्यक्ष श्रीकांत घोगरे, महासचिव राजकुमार दामोदर, महिला आघाडी अध्यक्षा आम्रपाली खंडारे, महासचिव संगीता अढाऊ, भारतीय बौद्ध महासभा (भा बौ म) महासचिव नंदकुमार डोंगरे, सम्यक अध्यक्ष धीरज इंगळे आणि विद्वत सभा अध्यक्ष सिद्धार्थ देवधरीकर प्रामुख्याने उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महागाईने होरपळणाऱ्या सामान्य जनतेने या बैठकांना आणि २५ मे रोजी होणाऱ्या बैलगाडी मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!