तेल्हारा ” निमा ” अध्यक्षपदी : डॉ.कैलाश साकरकर !
* गजानन आयुर्वेद मधील सभेत नूतन कार्यकारिणी जाहीर.
तेल्हारा ” निमा ” अध्यक्षपदी : डॉ.कैलाश साकरकर !
* गजानन आयुर्वेद मधील सभेत नूतन कार्यकारिणी जाहीर.

तेल्हारा :- तालुका प्रतिनिधी दि.16/03/2025
येथे नुकतीच बी ए एम एस एम एस व यु ना नी पदवीधारक डॉक्टरांची सभा संपन्न झाली सभेचे अध्यक्षस्थानी डॉक्टर ओ आर चौधरी त्या प्रमुख पाहुणे म्हणून राज्य शाखेचे संयुक्त सचिव डॉक्टर राहुल सदाफळे हे उपस्थित होते.
पाहुण्यांचे स्वागत डॉ. दीपक राऊत डॉ. सुधीर भुजबले डॉ. पंकज राठी यांनी केले सभेत तेल्हारा निमा शाखेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली त्यामध्ये अध्यक्षस्थानी डॉ. कैलाश साकरकर उपाध्यक्षपदी डॉ. सतीश वाकोडे कोषाध्यक्षपदी डॉ. महेश बोबडे तर सचिव पदी डॉ. आशिष राऊत यांची नियुक्ती करण्यात आली. तर सदस्य म्हणून डॉ. शुभम भरणे, डॉ. आशिष चांडक डॉ. गजेंद्र वसु, डॉ. सुप्रीत कराळे डॉ. अजय विखे डॉ. अंजली सदाफळे यांचा समावेश करण्यात आला.
तालुक्यातील सर्व बी ए एम एस व तसंबंधित पदवीधारक डॉक्टरांनी निमाचे सदसत्व त्वरित स्वीकारावे असे आव्हान याप्रसंगी शाखेचे उगवते अध्यक्ष डॉक्टर कैलाश साकरकर यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. सुधीर भुजबुले यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.सतीश वाकोडे यांनी केले.