Uncategorized

डॉ. संजय रोडगे यांना लोकमत ग्लोबल कन्वेंशन समिट अवॉर्ड 2025 ने सन्मानित

डॉ. संजय रोडगे यांना लोकमत ग्लोबल कन्वेंशन समिट अवॉर्ड 2025 ने सन्मानित. 

सेलू, (पुनमचंद खोना )दि. 17 मार्च 2025
परभणी जिल्ह्यातील नामवंत शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते *डॉ. संजय रामराव रोडगे* यांना शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कार्याबद्दल *लोकमत ग्लोबल कन्वेंशन समिट अवॉर्ड 2025* ने गौरविण्यात आले. हा प्रतिष्ठित पुरस्कार सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता *श्री सोनू सूद* यांच्या हस्ते हाँकाँगमधील मकाऊ येथे प्रदान करण्यात आला. या सोहळ्याला डॉ. रोडगे यांच्या सुविद्य पत्नी *डॉ. सविता रोडगे* यांचीही उपस्थिती होती.

डॉ. संजय रोडगे हे *श्रीराम प्रतिष्ठान सेलू* या शैक्षणिक संस्थेचे *संस्थापक अध्यक्ष* असून, 1999 पासून त्यांनी शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली *एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज, ज्ञानतीर्थ प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, उत्कर्ष विद्यालय, प्रॉस्परस पब्लिक स्कूल, आदित्य फार्मसी कॉलेज, अपूर्वा पॉलीटेक्निक* यांसारख्या शाळा व महाविद्यालये यशस्वीरीत्या चालवली जात आहेत.

डॉ. रोडगे यांनी शिक्षण प्रणालीत नावीन्य आणण्यासाठी इंग्लंड, रशिया, हाँगकाँग, सिंगापूर अशा विविध देशांतील शिक्षणपद्धतींचा अभ्यास केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची संधी मिळावी म्हणून त्यांनी *Curious Kids Play Education Center* सुरू केले असून, संपूर्ण भारतभर या उपक्रमाच्या फ्रँचायझी दिल्या जात आहेत.

शैक्षणिक योगदानासोबतच डॉ. रोडगे *गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी नेहमीच पुढे असतात*. त्यांनी सामाजिक व आरोग्य सेवा क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. ते *परभणी जिल्ह्यातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ* असून *अपूर्वा हॉस्पिटल, सेलू* चे यशस्वी नेतृत्व करतात.

डॉ. संजय रोडगे यांना मिळालेल्या या सन्मानामुळे सेलू आणि परभणी जिल्ह्यातील शिक्षण व आरोग्य क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!