विशाल परदेशी यांची मराठी पत्रकार परिषदेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती.
राज्य कार्यकारिणी बैठकीत घोषणा.
विशाल परदेशी यांची
मराठी पत्रकार परिषदेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती.
राज्य कार्यकारिणी बैठकीत घोषणा.

मुंबई : मराठी पत्रकार परिषदेच्या उपाध्यक्षपदी न्यूज 18 लोकमतचे प्रसिध्द अँकर विशाल परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मुंबई विभागाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी काल नांदेड येथे झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनंतर ही घोषणा केली.
विशाल परदेशी हे गेली काही वर्षे परिषदेशी जोडलेले आहेत. मुंबई शाखेचे पदाधिकारी म्हणूनही ते कार्यरत होते. त्यांच्यावर आता राज्य उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पुढील दोन वर्षे ते उपाध्यक्ष म्हणून काम पाहतील.
एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख यांनी विशाल परदेशी यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.