मराठी पत्रकार परिषदेची राज्य कार्यकारणी बैठक संपन्न.
नांदेड जिल्हा पत्रकार संघाचे नियोजनबद्ध आयोजन.
मराठी पत्रकार परिषदेची राज्य कार्यकारणी बैठक संपन्न.
नांदेड जिल्हा पत्रकार संघाचे नियोजनबद्ध आयोजन.
अकोला – दि.
मराठी पत्रकार परिषदेची राज्य कार्यकारणी बैठक नांदेड येथे रविवारी पार पडली. परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख,विश्वस्त किरण नाईक, मिलिंद आष्टीकर, सुरेश नाईकवाडे , शरद पाबळे, शिवराज काटकर,परिषदेचे माजी अध्यक्ष अकोला चे सिद्धार्थ शर्मा, अमरावती विभागीय सचिव शिखरचंद बागरेचा सह सर्व राज्य कार्यकारणी सदस्य,विभागीय सचिव, महिला अध्यक्ष,विविध ठिकाणचे जिल्हाध्यक्ष डिजीटल मिडिया राज्याध्यक्ष अनिल वाघमारे, उपाध्यक्ष अनिल उंबरकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.या बैठकीत अकोला जिल्ह्यातील प्रतिनिधित्व परिषदेचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा ,संजय खांडेकर यांनी केले. पत्रकारांच्या प्रलंबित विषयांवर येथे सर्वांगी चर्चा झाली .त्यात पत्रकार संरक्षण कायदा, वृत्तपत्रांच्या जाहिरात दरवाढीची मागणी करण्यात आली. सेवानिवृत्त पत्रकारांची सन्मान योजना, अधीस्वीकृती पत्रिका आणि आगामी अधिवेशन व विभागीय मिळावे यासंदर्भात येथे चर्चा झाली. बैठकीचे आयोजन नांदेड जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी यांनी सुनियोजित उत्तमरित्या केले होते.