शिवराज्याभिषेक एक शिवसंस्कार आहे – संघर्षकुमार सावरकर.
शिवराज्याभिषेक एक शिवसंस्कार आहे - संघर्षकुमार सावरकर.
शिवराज्याभिषेक एक शिवसंस्कार आहे – संघर्षकुमार सावरकर.

शुर सेनानी कर्ताजीराव जायले शौर्यदिन समिती व शौर्यभूमी स्मारक समिती सिरसोली जिल्हा अकोला व इतिहासकार वा सि बेद्रे इतिहास अकादमी यांचे वतीने संत गाडगे बाबा कर्मभूमी ऋणमोचण येथील पुर्णा नदीचे पाण्याचा जलकलष घेवून शिवराज्याभिषेक दिनी संघर्ष सावरकर निघाले रायगडावर,सदानंद खारोडे, सतिश पाटील चिकटे सह दिलीप वाघमारे ,सागर नेरकर,नितीन वाघमारे,विठ्ठल वाघमारे,ऋतिक मोंढे सहभागी होते.शौर्य भूमी समितीचे संघर्ष सावरकर यांच्या पुढाकाराने शिवराज्याभिषेक सोहळ्यात यांनी जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व केले.

या निमित्य तेराशे पायऱ्या चढणे तेराशे पायऱ्या उतरणे हा एक लक्षणीय अनुभव असून पाच लक्ष मावळे कार्यक्रमास उपस्थित होते.
विदर्भातून सुरेश खोटरे व कॅप्टन सुनिल डोबाळे ,अनंत गावंडे ,उमेश पाटील जायले,पंकज जायले ,अविनाश डिक्कर ,कॅप्टन मानकर,यांचे मार्गर्शनात सुरू असलेल्या शौर्यभूमी सिरसोली शौर्यदिन बाबतची माहिती महाराजांचे आताचे वंशज व आयोजक छत्रपती संभाजीराजे व उपस्थित आ.रोहितदादा पवार यांना कल्पना देण्यात आली.

छत्रपतीशिवराय ,स्वराज्य,शिवराज्याभिषेक हा एक संस्कार आहे तो कसा रूजतो ते येथे जाणवले. जात पात सगळ विसरून लाखो मावळे येथे येतात महाराजांची प्रेरणा घेतात यातून हा संस्कार कसा रूजतो या बाबत आपला अनुभव सांगत सावरकर म्हणाले की,अंगावर गडावरची धुळ घेवून महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात जाते .महाराजाची रजधुळ परत महाराष्ट्रात चेतना बनून प्रज्वलीत होते .रायगड किल्यावरून परतांना रायगडा वरिल पाण्याचा संकल्प कलष त्यांनी भरून आणून आपल्या मुलाकडे सुपुर्द केला.

एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे रायगड किल्यावर साजरा होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याने तो शिवसंस्कार रूजवला जात असल्यामुळे आपली संस्कृती ,आपल्या शक्तीची व शिवरायांच्या गडकिल्ले नियोजनाचा प्रत्यक्ष अनुभव येतो असेही त्यांनी सांगितले आहे.
