सोमेश्वर तळेगाव येथे गुरू महाराज पुजन व भजन संध्या.
सोमेश्वर तळेगाव येथे गुरू महाराज पुजन व भजन संध्या.
सोमेश्वर तळेगाव येथे गुरू महाराज पुजन व भजन संध्या.

तेल्हारा तालुक्यातील सोमेश्वर तळेगाव येथे गुरू पौर्णिमेचे औचित्य साधून गुरू महाराज पुजन व भजन संध्या मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.

दरवर्षी प्रमाणे श्री शिवाजी महाराज चौकात गुरु पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता भाविक भक्तांच्या वतीने श्री संत दादा महाराज यांच्या फोटोचे पुजन करून महाआरती करण्यात आली. त्यानंतर विविध प्रकारच्या धार्मिक गाण्याची भजन संध्या पार पडली.

यावेळी माजी पोलीस पाटील भाऊसाहेब खारोडे, बंडुभाऊ वानखडे, विलास पाटील खारोडे, सुभाष मानखैर, विजुभाऊ पाटील, हिंमत पाटील, महादेव खुमकर,सदानंद चोपडे, सुधाकर भामोद्रे,अशोकराव मानखैर, अजय मानखैर गुरुदेव मडंळाचे अध्यक्ष धनराज पिजंरकार, पवन पिजंरकार, सुपित भड, रावसाहेब पाटील, शिवाजी पाटील, दिलीप खारोडे,उद्धव मानखैर, अथर्व पाटील, सोहम पाटील, वेदांत खारोडे, श्रीकृष्ण ठाकरे यांची उपस्थिती होती.सदर कार्यक्रमाचे आयोजन सदानंद खारोडे यांनी केले.