आपला जिल्हा अकोला

तेल्हारा येथील इंदिरा गांधी पतसंस्थेला विदर्भरत्न पुरस्कार, संस्थेच्या वाटचालीत मानाचा तुरा.

तेल्हारा येथील इंदिरा गांधी पतसंस्थेला विदर्भरत्न पुरस्कार, संस्थेच्या वाटचालीत मानाचा तुरा.

तेल्हारा येथील इंदिरा गांधी पतसंस्थेला विदर्भरत्न पुरस्कार, संस्थेच्या वाटचालीत मानाचा तुरा.

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथील इंदिरा गांधी नागरी सहकारी पतसंस्थेला सेल डॉट इन संस्था मुंबईतर्फे देण्यात येणारा सन २०२६ चा विदर्भ रत्न पुरस्कार वितरण समारंभ रविवारी पार पडला.

गेल्या ३३ वर्षांपूर्वी तेल्हारा नगरीचे शिल्पकार माजी नगराध्यक्ष स्व. जयसिंह रामसिंह बलोदे यांनी इंदिरा गांधी नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना करून समाजहित जोपासले. लहान उद्योग व टपरी धारकांना पाठबळ देवून मोठे केले. लहान मोठ्या उद्योगांना चालना दिल्याने आज संस्था भरभराटीस आहे. संस्थेच्या शाखा झाल्या आहेत.संस्थेची वाढती वेल पाहता संस्थे तर्फे समाज उपयोगी विविध उपक्रम राबविले जातात. विविध शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी शालेय साहित्य वितरण, रुग्णांसाठी रुग्णवाहिकेची सोय, भागधारकांना भेटवस्तूचे वितरण यासह सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या संस्थेच्या कार्याची दखल घेऊन सदर विदर्भ रत्न पुरस्कार देण्यात आला आहे.

 सदर पुरस्कार प्रसिद्ध उद्योगपती रामरतन हाडगे, प्रसिद्ध सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्राप्तसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष विजयसिंह बलोदे, उपाध्यक्ष वासुदेवराव नासने, सहसचिव विजय शेळके, व्यवस्थापक संतोष खारोडे कर्मचारी घोडेस्वार यांच्या उपस्थितीत पुरस्कार स्वीकारण्यात आला. वर्षा उसगावकर यांनी प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन संस्थेचा गौरव केला या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने संस्थेच्या वाटचालीत मानाचा तुरा रोवला गेला आहे यामुळे संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकारी सदस्य व व्यवस्थापक यांचे सर्वच स्तरातून स्वागत होत असून शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!