आपला जिल्हा अकोला

पाथर्डी येथे शिवजयंती निमित्त ग्रामपंचायत च्या वतीने दिव्यांग शासन निधी वाटप,नोंदणीकृत 52 लाभधारक दिव्यांग व्यक्तींना धनादेश वितरण.

पाथर्डी येथे शिवजयंती निमित्त ग्रामपंचायत च्या वतीने दिव्यांग शासन निधी वाटप,नोंदणीकृत 52 लाभधारक दिव्यांग व्यक्तींना धनादेश वितरण.

पाथर्डी येथे शिवजयंती निमित्त ग्रामपंचायत च्या वतीने दिव्यांग शासन निधी वाटप,नोंदणीकृत 52 लाभधारक दिव्यांग व्यक्तींना धनादेश वितरण.

ग्राम पंचायत पाथर्डी येथे 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. शिवजयंती चे औचित्य साधून दिव्यांग निधी प्रत्येकी 2000/- रुपये चे धनादेश 52 दिव्यांग लोकांना वितरित करण्यात आले. तसेच गावातील सरकारी नोकरीवर निवड झालेल्या मुला मुलीचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार घेण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच सौ. प्रतिक्षा रोशन डामरे उपस्थित होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून गावचे प्रतिष्ठित नागरिक , माजी तंटा मुक्ती अध्यक्ष, वसंतराव अवचार हे उपस्थित होते. तसेच सौ. वनमाला पिंटू लुटे ग्राम पं सदस्य , विपुल बहाकर ग्राम पं सदस्य, शाहिस्ता अंजुम सौदागर ग्रा. पं सदस्य, विनोद दबडघाव पोलिस पाटील ,बंटी राऊत, ग्रामविकास अधिकारी एस. पी वानखेडे व सर्व दिव्यांग बांधव , गावकरी मंडळी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्राम पंचायत लिपिक पंकज काळे ,पाणी पुरवठा कर्मचारी किशोर इंगळे , राम इंगळे , प्रवीण पाथरकर , यांनी अथक परिश्रम घेतले तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रदीप तेलगोटे यांनी केले.

“शासन निर्णया नुसार ग्राम पंचायत उत्पन्नाच्या किमान 5% निधी दिव्यांग खर्च करणे आवश्यक आहे त्या नुसार ग्राम पंचायत ग्राम सभा ठराव घेऊन निधी वितरित करण्यात आला. या वर्षात समृद्ध ग्राम अभियान. अंतर्गत 50% घर पट्टी पाणी पट्टी सवलत मिळाल्या मुळे बरीच वसुली झाली त्या मुळे सर्वांना लाभ देणे शक्य झाले.

सौ.प्रतीक्षा रोशन डामरे सरपंच पाथर्डी

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!