तेल्हारा तालुका मध्ये ई-फार्मसी चा तीव्र विरोध करत एकदिवसीय मेडिकल व्यावसायिकांचा बंद.
तेल्हारा तालुका मध्ये ई-फार्मसी चा तीव्र विरोध करत एकदिवसीय मेडिकल व्यावसायिकांचा बंद.
तेल्हारा तालुका मध्ये ई-फार्मसी चा तीव्र विरोध करत एकदिवसीय मेडिकल व्यावसायिकांचा बंद.

आज दिनांक २० मे २०२६ रोज बुधवार ला अखिल भारतीय औषधी विक्री संघटनेने पुकारलेल्या अखिल भारतीय औषधा विक्रेता देशव्यापी बंद मध्ये तेल्हारा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी तालुका अध्यक्ष हरीश टावरी, सचिव दीपक पुंडकर, कोषाध्यक्ष अतुल कोरडे ,शहराध्यक्ष सुनील भैया, शहर सचिव धीरज राऊत, एक्झिक्युटीव्ह मेंबर मितेश मल्ल, दीपक मार्के यांच्या उपस्थितीत तेल्हारा शहरांमध्ये सर्व केमिस्ट सभासदांना एकत्रित करून स्थानिक टावर चौक व श्री संत तुकाराम चौकामध्ये इ-फार्मसी चा तीव्र विरोध करण्यात आला ऑनलाईन औषधी विक्रीचा निषेध नोंदवण्यात आला, सर्वांनी काळी पॅन्ट व पांढरा शर्ट परिधान करून त्यावर काळ्याफिती लावून निषेध व्यक्त केला.
यामध्ये ऑनलाइन औषधी विक्री प्रणाली विरोधात हा बंद पुकारण्यात आला व ई-फार्मसी चा तीव्र विरोध करण्यात आला, महत्त्वाचे म्हणजे ऑनलाईन औषधी विक्री बंद करा GSR ८१७ २८।८।२०१८ मागे घ्या. व कोविड GSR २२० दि.२६।३।२०२० मागे घ्या कॉर्पोरेट द्वारे व्यावसायिक डिस्काउंट बंद करा, बनावट औषधी पासून देश वाचवा, ई-फार्मसीमुळे गंभीर धोके, प्रिस्क्रीप्शन शिवाय औषधे विक्री, व बनावट निष्कृष्ट औषधाचा धोका, कोल्ड चेन व्यवस्थेतील त्रुटी, फार्मासिस्ट रुग्ण संवादाचा अभाव औषधी कायद्याचे काटेकोर पालन करा रुग्णांची सुरक्षा व आरोग्य हीच आमची प्राथमिकता. संविधानिक जबाबदारी भारतीय संविधानाचे अनुच्छेद 47 नुसार सरकारने जन आरोग्याचे संरक्षण करावे अशा मागण्या करण्यात आल्या.
यावेळी तेल्हारा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष- हरीष टावरी, सचिव- दीपक पुंडकर, कोषाध्यक्ष-अतुल कोरडे एक्झिक्यूटिव्ह- मेंबर मितेश मल, दीपक मार्के, दत्त मेडिकल तेल्हारा, यश मेडिकल तेल्हारा, नेकनाम मेडिकल पंचगव्हाण, सुयोग मेडिकल दानापूर ,सदगुरु मेडिकल तेल्हारा, विश्वेश मेडिकल दहिगाव, संत गजानन मेडिकल आडसूळ, प्रतीक्षा मेडिकल तेल्हारा, संजीवनी मेडिकल तेल्हारा, रोमश मेडिकल तेल्हारा, हरीओम मेडिकल दानापूर ,दुर्गाई मेडिकल पाथर्डी, योगीराज फार्मा तेल्हारा, श्रीराम मेडिकल तेल्हारा ,तेजस मेडिकल तेल्हारा, भारत मेडिकल तेल्हारा, शिवकृपा मेडिकल तेल्हारा, श्रद्धा मेडिकल तेल्हारा, विघ्नहर्ता मेडिकल तेल्हारा, पवार मेडिकल तेल्हारा, महालक्ष्मी मेडिकल तेल्हारा, आप्पा मेडिकल तेल्हारा, केबीएन मेडिकल तेल्हारा, श्रीराम मेडिकल दानापूर, साई मेडिकल माळेगाव, विठ्ठल मेडिकल तेल्हारा, सरिता जनरिक मेडिकल तेल्हारा, मानसी मेडिकल भांबेरी, श्री. गजानन मेडिकल तेल्हारा, वायएस मेडिकल तेल्हारा, रामचंद्र मेडिकल तेल्हारा, आशीर्वाद मेडिकल तेल्हारा, विशाल मेडिकल तेल्हारा, सान्वी मेडिकल तेल्हारा, सिद्धिविनायक मेडिकल, मोरया मेडिकल तेल्हारा, दारोकार मेडिकल तेल्हारा, सई मेडिकल तेल्हारा, यश मेडिकल तेल्हारा, प्रतीक्षा मेडिकल ह्या सर्वांची उपस्थिती होती. एकदिवशीय देशव्यापी संघटनेने निषेध व्यक्त करून बंद पाळला. तेल्हारा तालुका सचिव दीपक पुंडकर यांनी सर्व उपस्थित केमिस्ट सभासदांचे सहभाग नोंदवल्यामुळे आभार मानले.