सातपुडा एजन्सीचे महादेवराव खारोडे यांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात.मुख्यमंत्री सहायता निधीत 21 हजारांची मदत.
सातपुडा एजन्सीचे महादेवराव खारोडे यांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात.मुख्यमंत्री सहायता निधीत 21 हजारांची मदत.
सातपुडा एजन्सीचे महादेवराव खारोडे यांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात.मुख्यमंत्री सहायता निधीत 21 हजारांची मदत.

तेल्हारा – दि.
तेल्हारा शहरातील सातपुडा एजन्सीचे संचालक महादेवराव खारोडे यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात म्हणून 21 हजार रुपये चा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीत देण्यासाठी तहसीलदार तेल्हारा यांना बेलखेड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज नवदुर्गा उत्सव मंडळाने आयोजित मराठवाडा पूरग्रस्तांना मदतीचा हात कार्यक्रमात सदर धनादेश सुपुर्द करण्यात आला.

मराठवाड्यात पुर परिस्थीती भीषण झाली आहे. जनजीवन विस्कळीत होवून मोठे नुकसान ग्रामीण भागात झाले आहे. दैनंदिन जीवन उपयोगी साहित्य, खाद्यपदार्थ,अन्नधान्य नासाडी झाली अशा हतबल परिस्थितीत, नागरिकांना,शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे हि बाब हेरून अकोला जिल्हा तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज नवदुर्गा उत्सव मंडळाने दरवर्षी मंडळाचा होणारा महाप्रसाद करीता जमा झालेली अन्नधान्य सामग्री पुरपिडीताना पाठविण्याचा निर्णय घेतला व जनतेला मदतीचा हात देण्याची विनंती केली त्यानुसार तेल्हारा तालुक्यातील समाज सेवींचे सुद्धा मदतीसाठी हात पुढे आले. समाज माध्यमातील केलेल्या विनंतीवरून तेल्हारा येथील सातपुडा इरिगेशन, कृषि उद्योग ट्रेडर्स चे संचालक तळेगाव बाजार येथील महादेवराव खारोडे यांनी 21 हजार रूपये चा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी या माध्यमातून देण्याचा माणस व्यक्त केला.

श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक दरबार मळी येथे एका छोटेखानी कार्यक्रमात तेल्हारा तहसीलदार समाधान सोनवणे यांचे मार्गदर्शनात नायब तहसीलदार विकास राणे, पि.एस.आय. हिवरखेड गोपाल गिलबिले, मंडळ अधिकारी संजय साळवे,ग्राम महसूल अधिकारी बेलखेड सदींप ढोक, ममदाबाद तेल्हारा प्रविण गिल्ले, बिट जमादार प्रमोद चव्हाण व मंडळाचे जेष्ठ पदाधिकारी नारायणराव कुयटे, पंढरीनाथ कुयटे,गणेशराव वाकोडे, संतोष ठाकुर, श्रीकृष्ण खुमकर,मा उपसरपंच सत्यशील प्र सावरकर,बाळूभाऊ खुमकर,ख.वि.स.उपाध्यक्ष राजेश टोहरे,संजय बेंदरकर,तेजराव पाटील, शहादेवराव कुयटे, नरेंद्र खुमकर,से.सह.सो.उपाध्यक्ष गुरुदास खुमकर, मंडळाचे अध्यक्ष बबलू देशमुख, विशाल मलीये, मयुर खुमकर, क्रांतीकुमार सावरकर,अजय ठाकूर,शेखर खुमकर,बजरंग कुयटे, गणेश खुमकर,पवन खुमकर, सागर लोळे,नागेश खुमकर, गणेश क्षिरसागर, तथा ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात म्हणून मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये एकविस हजार रुपये चा धनादेश तहसीलदार तेल्हारा यांना महादेवराव खारोडे यांनी यावेळी दिला.
नायब तहसीलदार विकास राणे, हिवरखेड पि. एस. आय गिलबिले यांनी बेलखेड ग्रामस्थ श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडळ, सातपुडा एजन्सीचे संचालक महादेवराव खारोडे यांनी केलेल्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून श्री छत्रपती शिवाजी महाराज नवदुर्गा मंडळाच्या उपक्रमाची प्रेरणा घेऊन इतरही समाजसेवींनी पुरग्रस्ताचे मदतीसाठी पुढे यावे असे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नरेंद्र खुमकर यांनी केले.