हरवले आभाळ, हो तयाचा सोबती, बेलखेड येथून पूरग्रस्तांना मदतीचा हात. श्री छत्रपती शिवाजी महाराज नवदुर्गा मंडळ बेलखेड चा स्तुत्य उपक्रम.
हरवले आभाळ, हो तयाचा सोबती, बेलखेड येथून पूरग्रस्तांना मदतीचा हात. श्री छत्रपती शिवाजी महाराज नवदुर्गा मंडळ बेलखेड चा स्तुत्य उपक्रम.
हरवले आभाळ, हो तयाचा सोबती, बेलखेड येथून पूरग्रस्तांना मदतीचा हात.
श्री छत्रपती शिवाजी महाराज नवदुर्गा मंडळ बेलखेड चा स्तुत्य उपक्रम.
तेल्हारा – दि.
अस्मानी संकटामुळे शेतातील उभं पीक वाहून गेलं, कष्टाने उभा केलेला संसार डोळ्यादेखत उध्वस्त झाला आणि मायेनं सांभाळलेली जनावरे दावणीतच मृत्युमुखी पडली. मुलांची शाळा व शालेय साहित्य बुडले, दैनंदिन जीवन उपयोगी साहित्य, खाद्यपदार्थ,अन्नधान्य नासाडी झाली अशा हतबल परिस्थितीत, नागरिकांना,शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे हि बाब हेरून अकोला जिल्हा तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज नवदुर्गा उत्सव मंडळाने दरवर्षी मंडळाचा होणारा महाप्रसाद करीता जमा झालेली अन्नधान्य सामग्री पुरपिडीताना पाठविण्याचा निर्णय घेतला व जनतेला मदतीचा हात देण्याची विनंती केली त्यानुसार गावातील श्री रघुवीर नवदुर्गा उत्सव मंडळ, राजे संभाजी मंडळ, जय गजानन मंडळ यांनी सुद्धा अन्नधान्य स्वरूपात साहित्य जमा करून मदतीचा हात दिला.
गावातील समाज सेवींचे सुद्धा मदतीसाठी हात पुढे आले. समाज माध्यमातील केलेल्या विनंतीवरून तेल्हारा येथील सातपुडा इरिगेशन, कृषि उद्योग ट्रेडर्स चे संचालक तळेगाव बाजार येथील महादेवराव खारोडे यांनी 21 हजार रूपये चा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी या माध्यमातून दिला. श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक दरबार मळी येथे एका छोटेखानी कार्यक्रमात तेल्हारा तहसीलदार समाधान सोनवणे यांचे मार्गदर्शनात नायब तहसीलदार विकास राणे,पि.एस.आय.हिवरखेड गोपाल गिलबिले, मंडळ अधिकारी संजय साळवे,ग्राम महसूल अधिकारी बेलखेड सदींप ढोक, ममदाबाद तेल्हारा प्रविण गिल्ले, बिट जमादार प्रमोद चव्हाण व मंडळाचे पदाधिकारी ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत अन्नधान्य साहित्य सामग्री भरलेला टेम्पो मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात म्हणून पाठविण्यात आला. व मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये एकविस हजार रुपये चा धनादेश तहसीलदार तेल्हारा यांना महादेवराव खारोडे यांनी यावेळी दिला. नायब तहसीलदार विकास राणे, हिवरखेड पि. एस. आय गिलबिले यांनी बेलखेड ग्रामस्थ व मंडळाने केलेल्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून मंडळाच्या उपक्रमाची प्रेरणा घेऊन इतरही समाजसेवींनी पुरग्रस्ताचे मदतीसाठी पुढे यावे असे मनोगत व्यक्त केले.
अशाच प्रकारे विविध ठिकाणा वरून अनेक समाजघटकांनी सढळ हाताने पूरग्रस्तांना मदत करायला पुढे यावे अशा भावना या निमित्ताने व्यक्त केल्या जात आहेत. सदर स्तुत्य उपक्रम सन 1982 पासून सुरू असलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज नवदुर्गा मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्या युवकांचे पुढाकाराने करण्यात आला.
