तेल्हारा 61 सरपंचपदांचे आरक्षण
९ जुलै रोजी.
तहसील कार्यालय तेल्हारा येथे सोडत.
तेल्हारा तालुक्यातील २०२५ ते २०३० दरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे प्रवर्गनिहाय आरक्षण ९ जुलै २०२५ रोजी तहसील कार्यालय तेल्हारा येथे निश्चित करण्यात येणार आहे.
अकोला जिल्ह्यातील ,अकोट, तेल्हारा, मुर्तिजापूर, पातूर बाळापूर,बार्शीटाकळी तालुक्यातील २०२५ ते २०३० दरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत चे यापूर्वी ६ मे २०२५ रोजी आरक्षण जाहीर केले होते मात्र ग्रामविकास विभागाने नव्याने आरक्षण निश्चित करण्यात आल्याची अधिसूचना १३ जून २०२५ रोजी प्रसिध्द केली असून त्याद्वारे ९ जुलै रोजी आरक्षण निश्चित होणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी अध्यादेश जारी केले आहेत. त्यानुसार तहसीलदार तेल्हारा समाधान सोनवणे यांनी तेल्हारा तालुक्यातील 61 ग्रामपंचायत चे आरक्षण सोडत तहसील कार्यालयात दि. 9 जुलै रोजी सकाळी 11 वाजता ठरविले असून तसे संबधित विभाग व कार्यालय अधिकारी यांना कळविले आहे. तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक संबधीत गट, पक्ष संघटना यांचे पदाधिकारी सह गावकरी जनते करिता सुचीत केले आहे.
आता सरपंच निवडणूक थेट जनतेतून होत असल्याने या आरक्षण निवडीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील नजरा आता या आरक्षण प्रक्रियेकडे लागल्या आहेत.

प्रवर्गनिहाय आरक्षण – एकूण 61 ग्रामपंचायत पैकी 31 महिला. –
> अनुसूचित जाती 13 पैकी 7 महिला, अनुसूचित जमाती 6 पैकी 3 महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग 16 पैकी 8 महिला, खुला प्रवर्ग 26 पैकी 13 महिला,असे आरक्षण तेल्हारा तालुक्यातील असेल, असे अधिसूचनेत नमूद आहे.
आरक्षण सोडत –
दिनांक – 9/7/2025
वेळ – सकाळी 11 वाजता.
तेल्हारा –
उपस्थित राहण्याचे आवाहन
तहसील कार्यालय तेल्हारा
समाधान सोनवणे, तहसीलदार तेल्हारा यांनी केले आहे.