प्रहारचे ७/१२ कोरा यात्रेला पापड गाव पासून सुरवात.
प्रहार चा एकच नारा, बिजली गिरे या बारिश हो… हम हिम्मत से खड़े रहेंगे.
प्रहारचे ७/१२ कोरा यात्रेला पापड गाव पासून सुरवात.
प्रहार चा एकच नारा, बिजली गिरे या बारिश हो…
हम हिम्मत से खड़े रहेंगे.

बच्चू कडूं च्या नेतृत्वात ७/१२ कोरा कोरा कोरा यात्रेला आज अमरावती जिल्ह्यातील पापड गावापासून सुरवात झाली. देशाचे माजी कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगावा पापड पासून सुरु झालेल्या या पदयात्रेला महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आहे.

अमरावती जिल्ह्यातील देशाचे पहिले कृषी मंत्री डॉ पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगाव पापड या गाव पासून ते यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण पर्यंत यात्रा कितीही अडथळे आले, विजा कडाडल्या अन पाऊस आला तरी आता माघार नाही. शेतकरी कर्जमाफी झाल्याशिवाय आता थांबायचं नाही असा निर्धार बच्चूभाऊंनी केला आहे. आता सर्वांनीच या यात्रेत सहभागी होऊन शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्याची वेळ आली आहे. तेव्हा मोठ्या संख्येने जात, पात, धर्म, राजकीय विचार बाजूला ठेऊन शेतकरी म्हणून एक व्हा, मत कोणालाही द्या पण शेतकऱ्यांसाठी एकत्र या असे नारे देण्यात आले. पापड पासून सुरू झालेल्या यात्रेत प्रचंड जनसमुदाय पाऊस पाण्याची पर्वा न करता उपस्थित होता.