प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय हिवरखेड येथे नऊ ऑगस्ट रक्षाबंधन संपन्न.
संचालिका ब्रह्माकुमारी वैशाली दिदि यांचे मार्गदर्शन.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय हिवरखेड येथे नऊ ऑगस्ट रक्षाबंधन संपन्न.
संचालिका ब्रह्माकुमारी वैशाली दिदि यांचे मार्गदर्शन.

प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय हिवरखेड येथील संचालिका वैशाली दीदी यांनी भाऊ-बहिणींच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनाचे आध्यात्मिक महत्त्व उपस्थितांना समजावून सांगून, आत्मिक स्मृतीचा तिलक देऊन, हातावर रक्षा सूत्र बांधताना व्यक्तीने स्वतःच्या मनाची नकारात्मकते पासून रक्षा, पशुपक्ष्यांची तसेच प्रक्रूतीची सुद्धा रक्षा करण्याची दृढ प्रतिज्ञा करायला हवी असे उद्बोधन केले.प्रसंगी ब्रम्हाकुमारी वैशाली दीदी यांनी रक्षाबंधन केले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झालेले विजय साहेब पंचबुद्धे(PSI) तसेच नेवारे साहेब तद्वतच सेवानिवृत्त शिक्षक श्रीकृष्ण भड यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रमेश दुतोंडे हे उपस्थित होते. या प्रसंगी चंद्रप्रकाश भोपळे, अनिल कुमार भोपळे, किरण सेदानी, सुभाष राऊत, वासुदेव येलुकार ,महादेव वानखडे, मोहन वानखडे, प्रशांत ढोकणे, कैलास ईखार,गणेश भोपळे, नटवरलाल तापडिया, रामदास राऊत(बोर्डी शिवपुर), अंकित भाई, प्रणेशभाई, रोहणभाई, नितिनभाई तसेच मोठ्या संख्येने इतर भाऊ-बहीण सुद्धा उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुलभा दीदी यांनी केले.