अजनी-पुणे रोज धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस चे भव्य स्वागत.
अकोला रेल्वे स्थानकावर खासदार अनुप धोत्रे व स्थानिक आमदारांची उपस्थिती.
अजनी-पुणे रोज धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस चे भव्य स्वागत.
अकोला रेल्वे स्थानकावर खासदार अनुप धोत्रे व स्थानिक आमदारांची उपस्थिती.

अकोला रेल्वे स्थानकावर अजनी-पुणे रोज धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस चे भव्य स्वागत करण्यात आले. या आधुनिक, वेगवान आणि आरामदायी रेल्वेमुळे प्रवाशांना मोठी सोय होणार असून त्यांच्या प्रवासाचा अनुभव आणखी सुखद होणार आहे.

या स्वागत सोहळ्यात अकोला खासदार अनुप धोत्रे,आमदार रणधीरभाऊ सावरकर, आ.प्रकाश पाटील भारसाकळे, माजी महापौर विजय अग्रवाल, जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, किशोर मांगटे पाटील,वसंत बछूका, कृष्णा भैय्या शर्मा,सह भारतीय जनता पार्टीचे अकोला जिल्हा, शहर पदाधिकारी महिला आघाडी व रेल्वे स्थानक अधिकारी-कर्मचारी, आरपीएफ, जीआरपी यांचे अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते.