आपला जिल्हा अकोलाआपली शेती-माती

बेलखेड येथे नाफेड अंतर्गत हरभरा खरेदी शुभारंभ.

बेलखेड येथे नाफेड अंतर्गत हरभरा खरेदी शुभारंभ.

बेलखेड येथे नाफेड अंतर्गत हरभरा खरेदी शुभारंभ.

बेलखेड फार्मर प्रोड्यूसर कंपनीतर्फे नाफेड अंतर्गत हरभरा खरेदीला शनिवारी शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी प्रथम हरभरा घेऊन आलेले येथील शेतकरी प्रवीण बुरघाटे यांचा कंपनीतर्फे सत्कार करण्यात आला.


नाफेड अंतर्गत सध्या सर्वत्र हरभरा खरेदी करण्यात येत असून त्यासाठी शेतकऱ्यांनी अगोदर नोंदणी केलेली आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा हरभरा घेण्यास शनिवारी बेलखेड येथे शुभारंभ करण्यात आला. प्रतिक्विंटल 5875/- रुपये हा नाफेडचा हमीभाव असून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कंपनीचे अध्यक्ष ॲड. सुधाकर खुमकर यांनी याप्रसंगी केले. शेतकऱ्यांच्या हितासाठी कंपनी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.
कंपनीचे सचिव विलासआप्पा साखरे व संचालक सर्वश्री,अशोक बावस्कर, किशोर पाटील खुमकर, दिलीप कुळकर्णी, सुधीरआप्पा साखरे, सुधीर खुमकर, अरुण टोहरे, संदीप खुमकर,राम खुमकर, शिवाआप्पा साखरे, गजानन मते, अभी साखरे आदींची याप्रसंगी उपस्थिती होती.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!