तेल्हाऱ्यात रविवारी ग्राहक प्रबोधन सभा.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आयोजन.

दि आकोला – वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि आकोला च्या वतीने आतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकारातुन समृध्दी निर्माण करणे व सहकाराला बळकटी प्रदान करणेचे दुष्टीने तेल्हारा येथे दिनांक 22 जुन रोजी माहेश्वरी भवन तेल्हारा येथे सकाळी 11 वाजता ग्राहक प्रबोधन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक संदीप पाटील खारोडे राहणार आहेत तर प्रमुख अतिथी म्हणून दि आकोला वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ रूपालीताई संदीप खारोडे, तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक शांताराम काळे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष केशवराव ताथोड, बाजार समिती संचालक दामोदर मार्के, खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष सुरेश ढोले, जिनीग प्रसिंग अध्यक्ष शेषराव पाथीकर, सेवा सहकारी संस्था आडसुल चे माजी उपाध्यक्ष पुर्णाजी हेलगे, बाजार समिती संचालक पुंडलीकराव अरबट,बाजार समिती संचालक डॉ अशोक बिहाडे भाजपा चे तेल्हारा तालुका माजी अध्यक्ष गजानन उंबरकार, तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी सभापती तथा खरेदी विक्री संस्थेचे संचालक रमेश दारोकार, आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला सर्व आमंत्रित निमंत्रण नागरिकानी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्याधिकारी तथा तेल्हारा तालुका प्रमुख जि. एच. शिंदे, मार्केटिंग ऑफिसर ग्रेड 1 तेल्हारा तालुका एस. के गाडगे, तेल्हारा शाखेचे शाखाधिकारी ए. डी. धोत्रे यांनी केले आहे.