बेलखेड तेजस्वीनी विरांगणा शिबिराचा समारोप.
शारीरिक, आध्यात्मिक, वैचारिक शैक्षणिक उन्नती चे देण्यात आले धडे.
बेलखेड तेजस्वीनी विरांगणा शिबिराचा समारोप.
शारीरिक, आध्यात्मिक, वैचारिक शैक्षणिक उन्नती चे देण्यात आले धडे.

तेजस्वीनी विरांगणा या मुलींसाठी आयोजित विशेष संस्कार व स्वसंरक्षण शिबिराचा समारोप नुकताच उत्साहात संपन्न झाला. या शिबिरात परिसरातील विविध शाळांमधील मुलींनी सहभाग घेतला.
सप्ताहभर चाललेल्या या शिबिरात मुलींना शारीरिक शिस्त, स्वसंरक्षण कला, भारतीय संस्कृतीचे मूल्य, आत्मविश्वास वृद्धी, तसेच अध्यात्मिक शिक्षण देण्यात आले.
शिबिरातील मुलींनी शेवटच्या दिवशी दिलेल्या शिक्षणाचे प्रात्यक्षिके करून दाखवले. लेझिम, लाठी चालविण्याचे आणि शिस्तबद्ध संचलनाचे सुंदर सादरीकरण मुलींनी बेलखेड येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक दरबार मळी मध्ये सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

या शिबिराचे आयोजन आर्य समाज समिती बेलखेड, संस्कृती संवर्धन समिती, श्री गजानन महाराज मंदिर, संस्कार भारती आणि सहयोगी संस्थांच्या पुढाकाराने करण्यात आले.

समारोप प्रसंगी आयोजकांनी “मुलींनी केवळ सुरक्षित राहावे एवढाच हेतू नसून, त्या आत्मनिर्भर, संस्कारी आणि तेजस्वी बनाव्यात हाच आमचा उद्देश असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमात पालकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुलींचा आत्मविश्वास पाहून अनेकांनी अशा उपक्रमांचे नियमित आयोजन व्हावे, अशी मागणीही केली.