आईच्या स्मृती दिनानिमित्त विविध सरकारी शाळांमध्ये शालेय साहित्याचे वाटप.
विचारवंत व्याख्याते भिमराव परघरमोल सर कुटुंबाचा स्तुत्य उपक्रम.
आईच्या स्मृती दिनानिमित्त विविध सरकारी शाळांमध्ये शालेय साहित्याचे वाटप.
विचारवंत व्याख्याते भिमराव परघरमोल सर कुटुंबाचा स्तुत्य उपक्रम.

एक विचारवंत व्याख्याताच आपले विचार कृतीत आणून करू शकतो हे खऱ्या अर्थाने आईच्या स्मृती दिनानिमित्त भिमराव परघरमोल सर यांनी दाखवून दिले. परघरमोल कुटुंबाने सरकारी शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करून समाजापुढे एक आगळा वेगळा आदर्श घालून दिला.
भिमराव परघरमोल (व्याख्याता तथा अभ्यासक फुले शाहू आंबेडकर विचारधारा तेल्हारा जि. अकोला) यांच्या आईचा अकरावा स्मृतिदिन दि. १९ सप्टेंबर २०२५ रोजी होता. त्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी तीन वेगवेगळ्या शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. नगरपरिषद शाळा क्र.२ तेल्हारा येथे ३२ इंची एलईडी टीव्ही देऊन मुलांच्या डिजिटल अध्यापणामध्ये मदत करण्यास हातभार लावला. तर जि. प. मराठी उच्च प्राथमिक शाळा उकळी बु। व आपले बालपण ज्या शाळेत गेले ती मराठी प्राथमिक शाळा सावळा तालुका संग्रामपूर येथील शाळेत लेखन साहित्याचे वाटप केले.
कुटुंबाचा हा स्तुत्य उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे. सामाजिक दायित्व म्हणून समाजाचं काही देणं लागते. यासाठी ते सतत समाजकार्यासाठी धडपड करत असतात. त्यामुळे ते समाज उपयोगी अनेक उपक्रम करित असतात.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सिद्धार्थ तायडे, रवींद्र खुमकर, शिवाजी पवार, वंदना व्यवहारे शितल वाघमारे (परघरमोल) या शिक्षकांसह गावातील विलास पोहरकर, प्रवीण पोहरकर, मंगेश गवई, पत्रकार पंकज भारसाकळे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी पवार शिक्षक यांनी तर आभार प्रदर्शन सिद्धार्थ तायडे मुख्याध्यापक यांनी केले.