बेलखेड येथील पादंण शेत रस्त्यासाठी माजी उपसरपंच सत्यशील सावरकर यांचे निवेदन.
तहसीलदार तेल्हारा व बेलखेड ग्राम विकास-महसुल अधिकारी यांचे कडे पाठपुरावा.
बेलखेड येथील पादंण शेत रस्त्यासाठी माजी उपसरपंच सत्यशील सावरकर यांचे निवेदन.
तहसीलदार तेल्हारा व बेलखेड ग्राम विकास-महसुल अधिकारी यांचे कडे पाठपुरावा.
तेल्हारा – दि.
बेलखेड ग्रामपंचायत हद्दीत येणारे शेत पादंण रस्ते, पाऊलवाटा यांना रस्ता नंबर देवून मोजणी करून रस्ते मोकळे करण्या संबधी चे निवेदन बेलखेड चे माजी उपसरपंच सत्यशील प्रभाकरराव सावरकर यांनी तहसीलदार तेल्हारा समाधान सोनवणे व ग्रामविकास अधिकारी बेलखेड यांना ग्रामसभेत दिले आहे.
शासनाच्या होत असलेल्या पंधरवाडा सप्ताह मध्ये उपरोक्त रस्त्यांचा विचार व्हावा असे निवेदनात नमूद आहे.
बेलखेड गावचे चारही बाजूने शेत रस्ते मोजणी करून मोकळे करण्याची मागणी निवेदनात आहे. यामध्ये बेलखेड पाण्याची टाकी वडेश्वर डाबर चौफुली कोठा रायखेड दानापूर रस्ता, बेलखेड एसटी स्टॅन्ड पासून उंबरकर सोनारी कोठा रस्ता, बेलखेड कोल्हा हिंगणी रस्ता,बेलखेड वीरशैव स्मशान गोर्धारस्ता, बेलखेड आस नदी कालंका माता मंदीर तळेगाव रस्ता- अकोली रस्ता, बेलखेड घोडेगाव रस्ता, बेलखेड- आकोली जुना रस्ता, बेलखेड इंदिरा आवास तेल्हारा रस्ता, बेलखेड माळेगाव रस्ता जुना तेल्हारा रस्ता इत्यादी बाबत तत्कालीन सरपंच सौ ज्योतीताई गोमासे, उपसरपंच सत्यशील प्र सावरकर यांचे कार्यकाळात ग्रामपंचायत स्तरावर मासिक/ग्राम सभेत ठराव सन 2012-13 व सन 2018-19, 2024-25 मध्ये होवून पाठपुरावा झाला असून यामधील बेलखेड कोठा रायखेड ग्रा. म.73 रस्ता उपलब्ध बाबत अहवाल सुद्धा झाला आहे. यासह उर्वरित रस्ते पादंण शेतरस्ते, पाऊलवाटा मोकळ्या व्हावे करिता तहसीलदार तेल्हारा यांना दि. 11 सप्टेंबर ला बेलखेड चे माजी उपसरपंच सत्यशील प्रभाकरराव सावरकर यांनी सविस्तर निवेदन दिले आहे. तसेच बेलखेड मंडळ अधिकारी संजय साळवे, बेलखेड महसूल अधिकारी संदीप ढोक,बेलखेड ग्रामविकास अधिकारी कासदे, सरपंच सौ रत्नाबाई वरठे, उपसरपंच प्रफुल्ल उंबरकर यांना सुध्दा दि. 17 सप्टेंबर ला आयोजित ग्रामसभेत ठराव घेण्यासाठी निवेदन दिले आहे .या शेत रस्ता मोहिमेला बेलखेड ग्रामस्थांचे वतीने सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे.