शंभूराजांच्या जयघोषाने तेल्हारा नगरी दुमदुमली..
शहरातून काढण्यात आली भव्य मिरवणूक.

तेल्हारा दि :- धार्मिक सामाजिक व राष्ट्रीय कार्यामध्ये नेहमी पुढाकार घेणाऱ्या तेल्हारा येथील धर्मवीर संभाजी मंडळाच्या वतीने स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १४ मे ला शहरातील मुख्य मार्गाने भव्य मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी संभाजी राजांच्या जयघोषाने तेल्हारा नगरी दुमदुमून गेली होती.
देश धर्म पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था। महा पराक्रमी परम प्रतापी, एक ही शंभू राजा था।। शौर्य, वीरता आणि पराक्रम तसेच राष्ट्र व धर्माच्या रक्षणाकरिता आपल्या प्राणाची आहुती देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त संभाजी मंडळाच्या वतीने शहरातून मुख्य मार्गाने संभाजी राजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक करण्यात आली होती या मिरवणुकीमध्ये धर्मवीर संभाजी महाराज की जय , जय भवानी जय शिवराय अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्यात मिरवणुकीमध्ये प्रेरणादायी पोस्टर मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हातामध्ये दिसून आले शहरातील मुख्य मार्गाने मिरवणूक शांततेत व शिस्तीत काढून धर्मवीर संभाजी महाराज जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी धर्मवीर संभाजी मंडळाचे ,जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चोख होता.