आपला जिल्हा

इतर मागास प्रवर्गातील लोकांना स्वयंरोजगाराची सुवर्ण संधी. इमाव वित्त आणि विकास महामंडळाचे उपक्रम.

इतर मागास प्रवर्गातील लोकांना स्वयंरोजगाराची सुवर्ण संधी. इमाव वित्त आणि विकास महामंडळाचे उपक्रम.

इतर मागास प्रवर्गातील लोकांना स्वयंरोजगाराची सुवर्ण संधी.
इमाव वित्त आणि विकास महामंडळाचे उपक्रम.

अकोला, दि. १६ : राज्यातील इतर मागास प्रवर्गातील लोकांना स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी तसेच उच्च शिक्षणाकरिता शासनाने बहुजन कल्याण विभागांतर्गत महाराष्ट्र इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची स्थापना केली आहे. या महामंडळामार्फत कृषी संलग्न व्यवसाय वृद्धीसाठी अत्यंत अल्प व्याजदराने तसेच बिनव्याजी दराने कर्ज वितरीत करण्यात येते.

महामंडळाच्या योजना
२० टक्के बीज भांडवल योजना
ही योजना राज्यातील राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविली जाते. यामध्ये महामंडळाचा सहभाग २०, लाभार्थ्यांचा सहभाग ५, व बँकेचा सहभाग ७५ टक्के असतो. या योजनेमध्ये महत्तम प्रकल्प मर्यादा रु. ५ लक्ष आहे. अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्ष असावे.
थेट कर्ज योजना
ही योजना महामंडळामार्फत राबविली जाते. यामध्ये महत्तम कर्ज मर्यादा रु. १ लक्ष असून परतफेडीचा कालावधी ४ वर्ष आहे. या योजनेत शेतीला पूरक किंवा इतर छोट्या व्यवसायाकरिता कर्ज दिले जाते. परतफेडीचा कालावधी ५ वर्षे असून नियमित परतफेड केल्यास व्याज आकारले जात नाही, परंतु थकीत झालेल्या हप्त्यांवर वार्षिक ४% व्याज दर आकारण्यात येते. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लक्ष पर्यंत असावे. अर्जदाराचे वय १८ ते ५५ वर्ष असावे.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
गरजू व कुशल व्यक्तींना नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी तसेच व्यवसाय वृद्धीकारिता ही योजना राज्यातील राष्ट्रीयकृत बँकमार्फत तसेच सहकारी बँकेमार्फत राबविली जाते. व्यवसायाकरिता मागणीनुसार १ ते १० लक्ष पर्यंत बँकेमार्फत देण्यात येते. बँकेचे कर्ज नियमित परतफेड केल्यास महामंडळामार्फत १२% पर्यंत व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरुपात लाभार्थीला देण्यात येते. लाभार्थी कर्जासाठी ऑनलाइन महामंडळाच्या संकेतस्थळावर अर्ज करावा. कुटुंबाचे वार्षिक वय उत्पन्न ८ लक्ष पर्यंत असावे. अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्ष असावे.
शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना
उच्च शिक्षणाकरिता देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय अभ्याक्रमासाठी प्रवेश घेण्याकरिता रु. १० ते २० लक्ष इतके महत्तम कर्ज बँकेमार्फत दिले जाते.
बँकेचे कर्ज नियमित परतफेड केल्यास महामंडळामार्फत १२ टक्केपर्यंत ब्याज परतावा रक्कम अनुदान स्वरुपात लाभार्थीला देण्यात येते. अर्जदार इयत्ता बारावी मध्ये ६० टक्के व अधिक गुणांनी उत्तीर्ण असावा. अर्जदाराचे वय १७ ते ३० असावे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लक्ष पर्यंत असावे.
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
इतर मागासवर्गीय प्रवर्गातील गरीब व होतकरू महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी राज्यातील बचत गटातील उत्पादित केलेल्या वस्तूंचे उत्पादन प्रक्रिया व मूल्य आधारित उद्योगांकरिता बँकेमार्फत मंजूर करण्यात आलेल्या रु. ५ ते १० लक्ष पर्यंतच्या कर्ज रक्क्मेवरील १२ टक्के व्याज परतावा उपलब्ध करून देण्यात येते. सदर योजना महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत लोकसंचालित साधन केंद्राच्या सहाय्याने राबविण्यात येते. या योजनेचा लाभ घेणारी महिला इतर मागास प्रवर्गातील व महाराष्ट्राची रहिवासी असावी, त्यांचे वय १८ ते ६० वर्ष असावे. बचत गटाची नोंदणी महिला विकास महामंडळाच्या लोकसंचालित साधन केंद्रात केलेली असावी.
तरी वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र व्यक्तींनी ऑनलाईन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय (०७२४-२४१०२२१) अकोला यांच्याशी संपर्क करावा.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!