लग्न ब्रॅन्डेड पेक्षा, संसार ब्रॅन्डेड करावा. – सौ. माधुरी आकाशराव साबे (बिहाडे)
सामाजिक देण - लग्न ब्रॅन्डेड पेक्षा, संसार ब्रॅन्डेड करावा.(लेख क्रमांक - 1)
लग्न ब्रॅन्डेड पेक्षा, संसार ब्रॅन्डेड करावा. – सौ. माधुरी आकाशराव साबे (बिहाडे)
सामाजिक देण – लग्न ब्रॅन्डेड पेक्षा, संसार ब्रॅन्डेड करावा.(लेख क्रमांक – 1)
आज-काल लग्न थाटामाटात करणे हे एक स्टेटस चा विषय झाला आहे. वधू-वरांकडचे आणि इतर नातेवाईक हे लग्न कसं छान झालं ,किती खर्च केला ,कुठल्या सोयी सुविधा होत्या यावरच बोलतात .पण कुणालाही मुलगा- मुलगी यांचा स्वभाव झालेले संस्कार, मुलांना लहान वयात लावलेले वळण, घराण्याची पद्धत ,संस्कार रितीभाती यावर कुणीच बोलत नाही किंवा त्यांना तो विचार करावा याची गरजही वाटत नाही. तुम्ही म्हणाल यात काय नवीन आहे, त्यांच् एवढं काय आहे. पण खरी गंमत तर यातच आहे की लग्न म्हणजे काय? कशासाठी असते ,दोन व्यक्ती एकत्र येतात, दोन घराणे ,दोन फॅमिली सुद्धा एकत्र येतात, या लग्न पद्धतीमुळेच हे सर्व घडते दोन घरांमध्ये एकमेकांचे विचार जुळतीलच असे नाही. मग सुरू होतो वाद -विवाद, अपेक्षा, मान -अपमान असं बरच काही ,पण लग्न हा संस्कार आहे हा विषय बाजूलाच राहतो. आता तुम्ही म्हणाल लग्न ब्रॅण्डेड म्हणजे काय? तर त्यामध्ये एकमेकांना समजून उमजून संसार करणे, समोरचा जोडीदार एखाद्या वेळी चुकत असेल तर त्याला समजावून सांगणे ,योग्य ते मार्गदर्शन करणे, त्यात कुठलाही अहंकार नको, तो आला की मग संपलं सगळं !दोन मित्र कसे एकमेकांचे दुःख आनंद चांगले वाईट क्षण शेअर करतात, तसंच दोघांन मध्ये असायला हवे, पण त्यासाठी नात्यात महत्त्वाचा असतो तो विश्वास एकमेकांच्या कामा बदल आदर आणि,प्रेम.जोडीदाराबद्दल असलेला आदर युक्त प्रेमभाव हा असायलाच हवा मग ते नातं ओझ किंवा कंटाळवाणं न बनता खूप सुंदर वाटेल! सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतचा सहवास हा हवाहवासा वाटेल. मग तो कंटाळवाणा गुदमरलेला, जीवघेणा वाटणार नाही. कित्येक स्त्रिया किंवा पुरुष सुद्धा ही मजबुरी आहे . म्हणून शेवटपर्यंत निभावायचे म्हणून ,किंवा मुलांसाठी मन मारून संसार करतात. मी म्हणते अशी वेळच का येऊ द्यायची आपण! बायका तर नेहमी म्हणतात “पदरात पडलं बाई अन पवित्र झालं “पण खरं सांगू का कुठ कुठेतरी दोघांकडूनही चूक होते किंवा होऊ शकते मनासारखा नवरा किंवा बायको वागत नसेल तर तो तिचा किंवा त्याचा स्वभाव आहे म्हणून असे समजून घ्यायचं .माणूस पूर्णपणे वाईट नसतो वाईट असतात माणसांचे विचार .विचार बदला गोष्टी आपोआप सुधारायला लागतात .समोरच्याला त्याच्या अवगुना सकट स्वीकारायला हवं .त्याच्या आवडत नसलेल्या गुणांवर ही प्रेम करून बघा! चित्र आपोआप बदलेल. मुलींकडच्यानी खूप खर्च केला लग्नात किंवा मुलांकडे खूप दागिने आणले मुलीला हा तात- पुरता आनंद काही काळच टिकतो ! तो आनंद फार क्षणिक असतो. लग्नात केलेला भला मोठा खर्च दिखावा लोक नातेवाईक एक -दोन महिन्यात विसरून जातात पण शेवटपर्यंत सोबत राहतो तो आपला जोडीदार ,याचा कोणीही विचार करत नाही, हे नक्कीच !लग्नामध्ये अफाट खर्च न करता तोच पैसा आपण पुढील संसारिक गरजा ओळखून वापरण्यासाठी किंवा एकमेकांसोबतच्या गरजासाठी, किंवा आधुनिक गरजा भागविण्यासाठी केला तर जोडीदार खुश होईल किंवा मग तोच पैसा तुम्ही सामाजिक देण म्हणून एखाद्या आश्रम किंवा सेवाभावी संस्थेला देऊ शकता ,खूप काही चांगल्या गोष्टी तुम्ही त्यातून राबवू शकता किंवा करू शकता जसे गरजू लोकांना मदत समाजसेवी संस्था किंवा इतर सामाजिक संस्थाना त्यांना मदत ,किंवा सामाजिक कार्यक्रम त्यातून तुम्ही राबवु शकता. शेवटी काय हो !आनंद हा महत्वाचा .माणसाला आणखी काय पाहिजे असते, हे जिवन जगत असतांना, आपणाला आनंद ,समाधान ,निरोगी जीवन हेच महत्त्वाचं असतं !ते आपण इतरांना किंवा आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीबरोबर सुसंगतपणे राहून वैचारिक दृष्ट्या विचार करून, मानसिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या योग्य पद्धतीने वागून मिळू शकतो! हे जे एकमेकांसोबत राहणं हे म्हणजे एक प्रकारचं सुखच आहे .आणि तेच तर आपणाला हवं असतं. एकमेकांसोबत असणे .आयुष्यभरची सोबत एकदा का चुकली ना! सगळं आयुष्य हे बेचव बेरंग आणि उदासीन होऊन जातं .जोडीदाराची निवड ही खूप महत्त्वाची असते. आणि त्याहीपेक्षा त्याला कसं फुलवायचं त्या संसाराला कसं सुगंधी ठेवायचं ,रोज ताजतवाना कस ठेवायच हे दोघांचीही काम असते. त्याकरता दोघांनीही प्रयत्न करायला हवा .लग्न ब्रांडेड या विचारांमध्ये एकमेकांच्या कामाचा आदर, एकमेकांच्या विचारांचाआदर, एका एकमेकांच्या भावनांना समजून घेणे ,आपल्या जोडीदाराला काय हव नको हे बघणे, ते बघायलाच पाहिजे, मुलांवर चांगले संस्कार व योग्य रीतीने त्यांचे संगोपन हे पण मध्येच येतं .आपल्या जोडीदाराच्या मनात काय आहे हे अचूक ओळखता आलं पाहिजे तरच तो योग्य आणि अनुरूप जोडीदार समजावा .जोडीदाराच्या प्रत्येक योग्य गोष्टींमध्ये त्याला साथ द्यायला हवी! कधी -कधी एखादी गोष्ट नसेल पटत तरी त्याच्या आनंदाकरिता ती करायला पाहिजे.मला तरी वाटते काही हरकत नाही असे करायला हवे. करून तर बघा छान वाटेल !आपण दुसऱ्यांसाची मदत करतो तेच काम आपण आपल्या जोडीदारासाठी केले तर संसार हा आनंदी सुखमय, हवाहवासा होईल. मला वाटते हेच काय ते संसार ब्रॅण्डेड करणं आहे .म्हणूनच माझे असे परखड मत आहे की लग्न ब्रँडेड पेक्षा संसार ब्रँडेड असावा किंवा करावा.

सौ. माधुरी आकाशराव साबे (बिहाडे), एम. ए. मराठी,सिंहगड रोड, आंबेगाव,पूणे