शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत नोंदणी न केल्यास विविध शासकीय योजनांचा लाभ होऊ शकतो बंद.
तहसीलदार समाधान सोनवणे यांची माहिती.
शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत नोंदणी न केल्यास विविध शासकीय योजनांचा लाभ होऊ शकतो बंद.
तहसीलदार समाधान सोनवणे यांची माहिती.

तेल्हारा – दि.
शेतकरी माहिती संच निर्मिती आणि शेतकऱ्यांचे शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आयडी तयार करण्याची कारवाई अकोला जिल्ह्यात दिनांक 16/ 12 /2024 पासून सुरू झाली आहे. ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत डाटा आणि डिजिटल सेवा वापरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने व परिणामकारक पोहोचवण्याच्या दृष्टीने शेतकरी माहिती संच तयार करण्यात येणार असून त्याकरिता शेतकऱ्याचे शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आयडी तयार करणे चालू आहे.
सदर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी कृषी व संलग्न विभागांना शेतकऱ्यांचा व त्याच्या शेताचा आधार सलग्न माहिती संच फार्मर रजिस्टर तयार करण्यात येणार असून उपलब्ध आकडेवारी च्या आधारे शेतकरी बांधवांना विविध योजनांचा लाभ वितरित करण्यामध्ये सुलभता येईल आणि लाभार्थ्यांना वारंवार प्रमाणिकरणाची (e-kyc) आवश्यकता राहणार नाही.
परंतु अद्याप पर्यंत तेल्हारा तालुक्यातील 50% शेतकऱ्यांनीच नोंदणी केलेली आहे. यापुढे उर्वरित शेतकऱ्यांनी नोंदणी न केल्यास पीएम किसान योजना, नैसर्गिक आपत्ती अनुदान तसेच कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळणे बंद होऊ शकतो.
करिता उर्वरित शेतकरी खातेदार यांनी जवळच्या नागरिक सुविधा केंद्रात भेट देऊन आपले फार्मर आयडी दिनांक 20 मार्च पूर्वी तयार करून घ्यावेत जेणेकरून विविध शासकीय योजनांचा लाभ घेणे सोयीचे होईल याबाबत काही अडचण आल्यास ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन या द्वारे करण्यात येत असल्याचे तेल्हारा तहसीलदार समाधान सोनवणे यांनी कळविले आहे.